शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या हस्ते होणार नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजच्या कोनशिलेचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 15:50 IST

वाशिम : केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान २.० (रुसा) अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील चिखली (ता. मंगरूळपीर) येथे नवीन शासकीय मॉडेल डिग्री महाविद्यालय सुरु करण्यास मंजुरी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान २.० (रुसा) अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील चिखली (ता. मंगरूळपीर) येथे नवीन शासकीय मॉडेल डिग्री महाविद्यालय सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी १८ कोटी २५ रुपये अनुदान सुध्दा मंजूर केले आहे. या महाविद्यालयाचा कोनशिला अनावरण समारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजीटल लाँचिंग पद्धतीने रविवार, ३ फेब्रुवारी २०१९ रोजी वाशिम येथे होणार आहे. यावेळी प्रधानमंत्री मोदी उपस्थित विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम येथे हा कार्यक्रम होत आहे. याप्रसंगी गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, ऊर्जा राज्यमंत्री तथा वाशिमचे सहपालकमंत्री मदन येरावार, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार राज्य सल्लागार समितीचे उपाध्यक्ष आमदार श्रीकांत देशपांडे, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.नवीन शासकीय मॉडेल डिग्री महाविद्यालयाचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे. आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाच्या काळात विविध कौशल्य विकासाच्या दृष्टीने हे महाविद्यालय वाशिम जिल्ह्यासाठी एक उपलब्धी ठरणार आहे. रोजगार निर्मितीच्या दृष्टीकोनातून विविध विषय व अभ्यासक्रमाचा समावेश अपेक्षित असून याचा फायदा आकांक्षित जिल्हा असलेल्या वाशिमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे.

टॅग्स :washimवाशिमcollegeमहाविद्यालयNarendra Modiनरेंद्र मोदी