शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना; मंगरुळपीर तालुक्यातील १७ हजार शेतकरी लाभाच्या प्रतिक्षेतच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 14:16 IST

तालुक्यातील जवळपास २५ हजार शेतकरी पात्र असतांना केवळ साडेसात हजार कास्तकारांनाच प्रत्यक्ष योजनेचा लाभ मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर :   प्रधानमंत्री किसान सन्मान योजनअंतर्गत तालुक्यातील जवळपास २५ हजार शेतकरी पात्र असतांना केवळ साडेसात हजार कास्तकारांनाच प्रत्यक्ष योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरीत जवळपास १७ हजार कास्तकार योजनेच्या लाभाच्या प्रतिक्षेत असुन सर्व कास्तकारांना तातडीने लाभ मिळावा अशी मागणी पं.स. सदस्या  रफीका बानो युनूस खान व सामाजिक कार्यकर्ते युनूस खान यांनी केंद्रीय कृषि मंत्र्यांना निवदेनाद्वारे केली आहे. मंगरूळपीर तालुक्यातील २ हेक्टर किंवा त्यापेक्षाकमी जमीन असलेले १४२०० शेतकरी तर २ हेक्टरपेक्षा अधिक जमीन असलेले ६९०० जवळपास २१०० कास्तकार योजनेस पात्र आहेत. तर सामाईक क्षेत्रातील शेती कसणारे ४५००  शेतकरीसुध्दा या योजनेसाठी पात्र ठरल्याचे कळते. अशाप्रकारे मंगरूळपीर तालुक्यातील जवळपास २५ते ३० हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र असल्याचे कळते. असे असतांना आतापर्यन्त केवळ साडेसात हजार शेतक-यांच प्रत्यक्ष या योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरीत कास्तकार अजुनही योजनेच्या लाभाची वाट पाहत आहेत. जुलै महिन्यात पुरेसा पाउस नसल्याने शेतकरी अडचणीत आला असुन किटकनाशके व रासायनीक खतांचा वाढता खर्च पाहता पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हातभार लागेल अशी अपेक्षा असतांना ती फोल ठरली आहे. मंगरूळपीर तालुक्यातील कास्तकारांचे हाल पाहता तालुक्यातील शेतक-यांना जुलै महिना संपण्यापूर्वी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा तातडीने लाभ देण्याची मागणी पं.स. सदस्या सौ.रफीका बानो युनूस खान व सामाजिक कार्यकर्ते युनूस खान यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातुन केली आहे.

टॅग्स :washimवाशिमPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना