शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेचे काम अंतिम टप्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 14:45 IST

मालेगाव : मालेगाव तालुक्यातील सन २०११ चे आर्थिक सर्वेक्षणावर आधारीत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल वाटप होणार असून, सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

ठळक मुद्दे तालुक्यात २२ हजार अर्ज मालेगांव पंचायत समितीला प्राप्त झाले होते. लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्या लाभार्थ्याला १३८००० रुपये अनुदान देण्यात येनार आहे.

मालेगाव : मालेगाव तालुक्यातील सन २०११ चे आर्थिक सर्वेक्षणावर आधारीत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल वाटप होणार असून, सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. घरकुलासंदर्भात फसवणूक होऊ नये म्हणून लाभार्थींनी कोणत्याही दलालाशी आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन गटविकास अधिकारी संदीप कोटकर यांनी केले.सन २०११ ला आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार त्याची अंमलबजावनी सन २०१६ ते २०१७  नुसार  सुरू असुन त्याचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. त्यानुसार तालुक्यात २२ हजार अर्ज मालेगांव पंचायत समितीला प्राप्त झाले होते. त्यानुसार गटविकास अधिकारी संदीप कोटकर यांच्या मार्गदशनाखाली तालुक्यात १८ पथक तयार करण्यात आले. प्रत्येक पथकामध्ये १ प्रमुख  व उपसहायक नेमल्या गेले होते. त्यांच्या साहाय्याने हे काम सुरू आहे त्यानुसार लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्या लाभार्थ्याला १३८००० रुपये अनुदान देण्यात येनार आहे. त्यांचे अपात्रता निकष नुसार २, ३ किंवा ४ चाकी वाहन, शेती, मशिनरी असल्यास, किसान क्रेडीट कार्ड आहे परंतु त्यांची मर्यादा ५०००० किंवा त्यापेक्षा जादा असल्यास, शासकीय नौकरी असल्यास  नोंदनीकृत बिगरशेती व्यवसाय असल्यास, आयकर धारक असल्यास व्यवसाय कर भरणारे असल्यास,  २ .५ एकर बागायत क्षेत्र आणि सिंचंनाचे कमीत कमी एक साहीत्य असल्यास ५ एक्कर किंवा त्यापेक्षा जादा बागायत क्षेत्र तसेच दोन हंगामात पीक घेतले जात असल्यास  ७.५ एकर क्षेत्र आणि सिंचनाचे किमान एक साहित्य असल्यास  तसेच पक्के घर बांधकाम असल्यास लाभार्थी अपात्र ठरविन्यात येनार आहेत. बाकी लाभार्थी पात्र ठरणार आहेत. मात्र काही लोक लाभार्थ्यांशी संपर्क साधुन पैसेची मागणी करीत असल्याच्या तक्रारी आहेत. या पृष्ठभूमीवर कुणीही कोणाशीही अर्थिक व्यवहार करू नये अशी माहिती गट विकास अधिकारी संदीप कोटकर यांनी दिली.

 

अटी पूर्ण करणाºया लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र आपला नंबर लागेल यासाठी लोक आर्थिक व्यवहार करतील, अशी शक्यताही नाकारता येत नाही. म्हणून कोणीही कोणत्याही दलालांशी आर्थिक व्यवहार करू नये. निकषानुसार लाभार्थी निवड होणार आहे.- संदीप कोटकर, गट विकास अधिकारी, मालेगाव.

आमच्या चमूने २२ हजार घरांचे सर्वेक्षण केले असून, सर्व माहिती  लाभर्थ्यांची नावे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविली आहे. वरिष्ठ स्तरावर पुन्हा पाहणी झाल्यानंतर लाभार्थींची नावे निश्चित केली जाणार आहेत.

- रविन्द्र सोलव, विस्तार अधिकारी, मालेगाव

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवgovernment schemeसरकारी योजना