शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री पिक विमा योजनेस ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 14:04 IST

वाशिम : तांत्रिक अडचणींमुळे पीक विमा भरण्यास व्यत्यय निर्माण झाल्याच्या पृष्ठभूमीवर शासनाने खरिप हंगामातील प्रधानमंत्री पिक विमा योजनेस ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

ठळक मुद्देवाशिम जिल्हयात सन २०१८-१९ या वर्षातील खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविली जात आहे. अंतिम मुदत बिगर कर्जदार शेतकºयांसाठी २४ जुलै २०१८ व कर्जदार शेतकºयांसाठी ३१ जुलै २०१८ अशी होती.परंतू, सदर योजनेकरीता कार्यान्वित पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे काही बिगर कर्जदार शेतकरी विमा योजनेत भाग घेऊ शकले नाहीत.

लोकमत न्यूज  नेटवर्कवाशिम : तांत्रिक अडचणींमुळे पीक विमा भरण्यास व्यत्यय निर्माण झाल्याच्या पृष्ठभूमीवर शासनाने खरिप हंगामातील प्रधानमंत्री पिक विमा योजनेस ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.वाशिम जिल्हयात सन २०१८-१९ या वर्षातील खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविली जात आहे. उभ्या पिकास दुष्काळ, पूर, भुस्खलन, चक्रीवादळ, अतिवृष्टी, किड, रोगराई, पावसातील खंड, नैसर्गिक आग, विज कोसळणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीपासून होणाºया पिक नुकसानास संरक्षण देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. विमा हप्त्यास प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत बिगर कर्जदार शेतकºयांसाठी २४ जुलै २०१८ व कर्जदार शेतकºयांसाठी ३१ जुलै २०१८ अशी होती. परंतू, सदर योजनेकरीता कार्यान्वित पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे काही बिगर कर्जदार शेतकरी विमा योजनेत भाग घेऊ शकले नाहीत. कोणताही शेतकरी वंचित राहू नये याकरीता शासनाने २३ जुलै २०१८ च्या निर्णयान्वये बिगर कर्जदार व कर्जदार शेतकºयांसाठी सदर योजनेस ३१ जुलै २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली. शेतकºयांनी विहित प्रपत्रात विमा प्रस्ताव विमा हप्त््यास अंंितम मुदतीपुर्वी प्रस्ताव दाखल करण्यासाठी नजिकच्या सामुहिक सुविधा केंद्र व बँकाकडे सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत सात-बाराउतारा, आधारकार्ड, पेरणी केलेले स्वयं घोषणापत्र विमा प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे या योजनेत भाग घेणाºया शेतकºयांचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. वाशिम जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकºयांनी विमा प्रस्ताव दाखल करण्यासाठी नजिकच्या सामुहिक सुविधा केंद्र व बँकाकडे जावे. अधिक माहितीकरीता बँक, तालूका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमCrop Insuranceपीक विमा