शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा बाजार समितीत शेतमालाची आवक वाढताच भाव गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 14:28 IST

मानोरा : नवीन सोयाबीन व अन्य शेतमालाची आवक वाढताच, मानोरा बाजार समितीत बाजारभाव गडगडल्याने शेतकºयांची दैना कायम असल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : नवीन सोयाबीन व अन्य शेतमालाची आवक वाढताच, मानोरा बाजार समितीत बाजारभाव गडगडल्याने शेतकºयांची दैना कायम असल्याचे दिसून येते. हमीभावाच्या नियमाची सर्रास पायमल्ली करणाºयांविरोधात ठोस कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी शेतकºयांमधून होत आहे.मागील काही वर्षापासुन मजुराअभावी शेतकºयांनी कपाशीकडे पाठ फिरविली. यावर्षी सुरूवातीला बºयापैकी पाऊस झाला. त्यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट येत आहे. शेतकरी एका संकटातून सावरत नाही; तोच दुसरे संकट समोर ठाकत आहे. सोमवार, १ आॅक्टोबर हा बाजाराचा पहिला दिवस असतांना शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये सोयाबीन आणले होते. मानोरा बाजार  समिती किमान ५ हजार क्विंटलपर्यंत सोयाबीन ची आवक असल्याने बाजार समितीचे तिन्ही यार्ड पुर्णत: भरलेले होते. जागा नसल्यामुळे बाजार समिती समोरील प्रांगणातही सोयाबीन टाकण्यात आले होते. शेतमाल तारण योजनेच्या सभागृहातही सोयाबीन पोत्याचे ढिग लागले आहेत. आवक वाढताच सोयाबीनचा दर प्रचंड गडगडला आहे. गत आठवड्यात सोयाबीनचे दर प्रती क्विंटल ३५०० ते ३६०० रुपयाच्या घरात होते. १ आॅक्टोबरला प्रती क्विंटल २५०० ते २९०० रुपयापर्यंत सोयाबीनला दर मिळाले. शासनाने सोयाबीनला ३३९९ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. तथापि, मानोरा बाजार समितीत हमीभावापेक्षा तब्बल ४०० ते ८०० रुपयापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी केली जात असल्याने शेतकºयांची एकप्रकारे लुट सुरू असल्याचे दिसून येते. यामुळे लागवड खर्च आणि मजूरीचा खर्चही वसूल होत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकºयांमधून उमटत आहेत. हमीभावाने शेतमालाची खरेदी व्हावी, अशी मागणी शेतकºयांनी केली.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा