शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

स्थापनेपूर्वीच द्यावा लागला बाप्पांना निरोप....का ओढावली ही वेळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 11:59 IST

स्थापनेपूर्वीच बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करून जड अंतकरणाने निरोप देण्याची वेळ भाविकांवर आली.

लोकमत न्युज नेटवर्कपोहा: जिल्हाभरात गणरायाच्या स्वागताची धामधूम शनिवारी सुरू असताना कारंजा तालुक्यातील पोहा येथे एका गणेश मंडळानेही स्थापनेसाठी गणेशमूर्ती आणली; परंतु ही मूर्ती स्थापन करण्याची तयारी सुरू असतानाच या मंडळाच्या अध्यक्षाचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे स्थापनेपूर्वीच बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करून जड अंतकरणाने निरोप देण्याची वेळ भाविकांवर आली.सर्वांचा आवडता आणि मांगल्याचे प्रतिक असलेल्या गणरायाचे शनिवारी कोरोना संसर्ग काळातही उत्साहात स्वागत सुरू होते. या उत्सवादरम्यान कोरोना संसर्गाला थारा मिळू नये म्हणून प्रशासनाने नियम घालून दिले आहेत. पोलीस प्रशासनानेही वाशिम जिल्ह्यात गणेश मंडळांचे समुपदेशन करून एक गाव एक गणपतीची संकल्पना राबविण्याचे आणि गणेश मंडळांची संख्या कमी करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळेच वाशिम जिल्ह्यात यंदा गतवर्षीच्या तुलनेत सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या निम्म्यावरच आली आहे. त्यात कारंजा तालुक्यातील पोहा येथे पाच गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी केली होती. त्यात एका गणेश मंडळाने गणेश मूर्तीही गावात आणली आणि स्थापनेची तयारी सुरू केली. त्याचवेळी या मंडळाच्या अध्यक्षाचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती ग्रामपंचायत व प्रशासनाला मिळाली. ही बाब आरोग्य विभागाने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे पोलिसांचा ताफा पोहा येथे धडकला. त्यांनी संबंधित परिसर सोडून गावाबाहेर मूर्ती स्थापन करण्याचा सल्लाही मंडळाला दिला; परंतु मंडळाने मूर्ती विसर्जित करण्याची तयारी दर्शविली आणि पोलिसांच्या समक्ष गावातील नदीपात्रा गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. प्रशासनाने केल्या मंडळाच्या रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टयंदाच्या गणेशोत्सवादरम्यान खबरदारी म्हणून जिल्हाप्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सर्वच मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात नोंदणी करणाºया सर्वच गणेश मंडळांच्या अध्यक्ष पदाधिकाºयांची शुक्रवारी रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट घेण्यात आली. त्यात टेस्ट किट संपल्याने पोहा येथील मंडळांची रॅपिड टेस्ट शनिवारी सकाळी करण्यात आली. त्याचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाला. त्यातच एका मंडळाच्या अध्यक्षाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.  गणेशोत्सवाच्या पृष्ठभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व गणेश मंडळ पदाधिकाºयांच्या रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट घेण्यात आल्या. त्यात पोहा येथील एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला. ही माहिती गणेश स्थापनेपूर्वीच त्यांना देण्यात आली. कारंजा पोलिसांनी त्यानंतर त्यांचे समुपदेशन केले.-धीरज मांजरे,तहसीलदार, कारंजा. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याGanesh Mahotsavगणेशोत्सव