वाशिम: मानोरा तालुक्यातील पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे सादरीकरण पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या सभेत करण्यात आले. आ. लखन मलिक, आ. अमित झनक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए. एम. भाले, कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर आदी यावेळी उपस्थित होते. आर्किटेक्ट पूजा क्षत्रिय यांनी आराखड्यामध्ये समाविष्ट बाबींची सविस्तर माहिती दिली तसेच पोहरादेवी येथे वन विभागामार्फत करण्यात येत असलेल्या पर्यटन विकासाचा आढावा पालकमंत्री डॉ. पाटील यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी माहिती दिली.
पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे सादरीकरण
By admin | Updated: February 8, 2016 02:26 IST