शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 11:25 IST

Washim ZP News न्यायालयीन निर्णयानुसार १७ मार्चपर्यंत निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची अपेक्षा पराभूत उमेदवार बाळगून आहेत.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या ओबीसी प्रवर्गातील सदस्यांची पदे रिक्त करून दोन आठवड्यांत निवडणूक कार्यक्रम घोषित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्चला दिला. त्यानुसार जि.प. चे १४ व पं. स. च्या १९ सदस्यांची पदे रिक्त झाली. न्यायालयीन निर्णयानुसार १७ मार्चपर्यंत निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची अपेक्षा पराभूत उमेदवार बाळगून आहेत. त्या अनुषंगाने मतदारांच्या भेटीगाठी घेत प्रतिस्पर्धी उमेदवार हे निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्चला आरक्षणासंदर्भातील याचिका निकाली काढत, ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून दोन आठवड्यांत पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला. न्यायालयाच्या या निकालानुसार, ओबीसी प्रवर्गातील जिल्हा परिषदेचे १४ व पंचायत समितीच्या १९ सदस्यांची पदे रिक्त झाली आहेत. सदस्यांना पदे रिक्त झाल्याची नोटीस बजावून जिल्हा निवडणूक विभागाने १० मार्चपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाकडे अहवालही सादर केला. न्यायालयीन निर्णयानुसार दोन आठवड्यांत निवडणूक कार्यक्रम घोषित होणार की याप्रकरणाला स्थगिती मिळणार, याबाबत पायउतार झालेल्या सदस्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, ४ मार्चपासून दोन आठवड्यात अर्थात १७ किंवा १८ मार्चपर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची अपेक्षा २०२० च्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार बाळगून आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत जिल्हा परिषदेचे तत्कालीन १४ सदस्य हे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत, तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी व पराभूत उमेदवार हे संभाव्य निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोरोनाकाळातही मतदारांच्या भेटीगाठी घेत असल्याने निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात होत आहे. दोन आठवड्यांत निवडणूक कार्यक्रम घोषित होणार की स्थगिती मिळणार, निवडणूक कार्यक्रम लाबंणीवर पडणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

ओबीसी जनगणना नसल्याने आरक्षणाचा तिढा!जिल्हा परिषदेच्या ओबीसी प्रवर्गाच्या १४ पैकी तीन जागा अतिरिक्त ठरल्याचा मुद्दा उपस्थित करीत सर्वोच्च न्यायालयाने संबंधित चौदाही सदस्यांचे पद रिक्त करीत निवडणूक कार्यक्रम घोषित करण्याचा आदेश दिला. दरम्यान, ओबीसी प्रवर्गाची जनगणना झाली नसल्याने जिल्हा परिषदेच्या १४ पैकी ११ गटांत ओबीसीचे आरक्षण कोणत्या आधारावर काढण्यात येणार, उर्वरित कोणते तीन गट खुल्या प्रवर्गासाठी निघणार, याबाबत राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू आहे.

निसटता पराभव झालेले उमेदवार लागले कामाला२०२० च्या जिल्हा परिषद निवडणुकीत निसटता पराभव पत्करावा लागलेले उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येते. दाभा जिल्हा परिषद गटात प्रतिस्पर्धी उमेदवाराला ३३ मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. भर जहॉंगीर गटात प्रतिस्पर्धी उमेदवाराचा ८२ मतांनी पराभव झाला होता. काटा गटात तत्कालीन उमेदवारांचा १०९७ मतांनी विजय झाला होता. याप्रमाणे उकळीपेन १९५६, पार्डी टकमोर ११५५, कंझरा ११२६, आसेगाव ३२७८, कवठा १३९१, गोभणी १५४२, कुपटा गटात १२९७, फुलउमरी १२८७, पांगरी नवघरे ८९९, भामदेवी ४११ आणि तळप बु. गटात तत्कालीन विजयी उमेदवारांनी ७८४ मतानी प्रतिस्पर्धी उमेदवारांना पराभूत केले होते.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद