शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉटर कप’ २०१९ ची तयारी;  विळेगाव, बोरव्ह्यात प्रशिक्षण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 17:41 IST

वाशिम: पाणी फाऊंडेशनच वॉटर कप २०१९ ची तयारी सुरू झाली आहे. येत्या ८ एप्रिलपासून सुरू होणाºया या स्पर्धेसाठी यवतमाळ जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींची तीन पथके जिल्ह्यात दाखल होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पाणी फाऊंडेशनच वॉटर कप २०१९ ची तयारी सुरू झाली आहे. येत्या ८ एप्रिलपासून सुरू होणाºया या स्पर्धेसाठी यवतमाळ जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींची तीन पथके जिल्ह्यात दाखल होणार आहेत. त्यापैकी कारंजा तालुक्यातील विळेगाव येथे दारव्हा येथील एक पथक दाखल झाले असून, प्रशिक्षणाला सुरूवातही झाली आहे. पाणी फाऊंडेशनच्या तिसºया पर्वातील वॉटर कप २०१९ ही स्पर्धा राज्यातील ७६ तालुक्यांत राबविली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या तालुक्यातील हजारो गावांनी अर्जही भरुन दिले असून, स्पर्धेसाठी प्रत्येक गावातील पाच प्रशिक्षणार्थींची निवडही करण्यात आली आहे. या प्रशिक्षणार्थींना पाणी फाऊंडेशनच्यावतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात गतवर्षी तालुकास्तरावर विजेते ठरलेल्या गावांत प्रशिक्षणाची तयारी करण्यात आली असून, यात कारंजा तालुक्यातील विळेगाव आणि मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा गावाचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा, कळंब आणि उमरखेड येथील प्रशिक्षणार्थींची पथके येणार आहेत. त्यापैकी कारंजा तालुक्यातील विळेगाव येथे दारव्हा येथील पथक दाखल झाले असून, त्यांच्या प्रशिक्षणास सुरुवातही झाली आहे, तर येत्या आठवड्यात बोरव्हा येथे कळंब आणि उमरखेड येथील पथके दाखल होणार आहेत. प्रत्येक तालुक्यातील ८ पथके प्रशिक्षणासाठी येणार असून, प्रत्येक पथकात ५० प्रशिक्षणार्थींचा सहभाग असणार आहे. एका पथकासाठी चार दिवसांचे प्रशिक्षण राहणार असून, ही मंडळी पाणलोटाचे विविध उपचार, माथा ते पायथा उपचार करण्याचे महत्व, पावसाचे पाणी गावातच  अडवून जमिनीत कसे मुरविले जाईल आदिंबाबत विविध कृतीगीत, खेळ, प्रत्यक्ष उपचार व मनोरंजनाच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. या प्रशिक्षणार्थींना पाणी फाऊंडेशनचे विदर्भ मास्टर हेड सुमित गोरले यांच्या मार्गदर्शनात कारंजा तालुक्यातील खेर्डा येथील मास्टर ट्रेनर जीवन गावंडे खेर्डा, सामाजिक प्रशिक्षक सीमा ताकसांडे, तांत्रिक प्रशिक्षक बनसोड आणि तांत्रिक सहाय्यक मार्गदर्शन करणार आहेत.  विळेगाव येथे दारव्हा तालुक्यातील प्रशिक्षणार्थी विळेगाव येथे पोहोचल्यानंतर त्यांचे मिरवणूक काढून, पाय धुऊन, बँड पथकाच्या गजरात स्वागत करण्यात आले. गावच्या सरपंच माला संजय घुले, तसेच ग्रामसचिव वडते यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा