शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंञी ग्राम सडक योजनेला मूदतवाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 16:20 IST

पंतप्रधान ग्रामसडक योजना कर्मचारी संघटनेही पुढाकार घेवून मुदतवाढीची मागणी केली होती.

वाशिम : प्रधानमंञी ग्राम सडक योजनेची मूदत ही ३१ मे रोजी संपल्यामुळे या योजनेवर काम करणारे सर्व कर्मचारी घरी बसल्याने राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांना खिळ बसणार होती. तसेच राज्य, विभागीय व जिल्हास्तरावर १३८४ पदे ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी ५ जून रोजी रद्द केली होती. परंतु ९ जून रोजी ग्रामविकास विभागाचे उपसचिवांनी ३१ आॅगस्टपर्यंत या योजनेला मुदतवाढ दिली.केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य, विभागीय व जिल्हास्तरावर १३८४ पदे निर्माण करण्यात आली होती. ही सर्व पदे ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी ५ जून रोजी रद्द केली. यामुळे राज्यातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कामांना खिळ बसणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. ३१ मे नंतर कोणत्याही पदाचे वेतन काढण्यात येणार नसल्याने कोरोनाच्या पृष्ठभूमिवर पंतप्रधान सडक ग्राम योजनेतर्गंत आलेल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. विशेषता ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे रखडणार असल्याचे दिसून येत होते. या संदर्भात पंतप्रधान ग्रामसडक योजना कर्मचारी संघटनेही पुढाकार घेवून मुदतवाढीची मागणी केली होती. ग्रामविकास विभागाचे उपसचिवांनी महाराष्टÑ ग्रामीण रस्ते विकास संस्था, कार्यकारी अभियंता यांना पत्र पाठवून कळविले की, वित्त विभागाकडून प्राप्त अभिप्रायानुसार या विभागाील सर्व अस्थायी पदांना १ जून २०२० पासून ३१ आॅगस्ट पर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याचे कळविले आहे. प्रधानमंञी ग्राम सडक योजनेची मूदत ही ३१ मे रोजी संपल्यामुळे या योजनेवर काम करणारे सर्व कर्मचारी घरी बसले होते, त्यांना कोणत्याच प्रकारचा पगार देण्यात येणार नसल्याचे कळविण्यात आले होते. परंतु नुकतीच या योजनेला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.- विकास देवकतेमहाराष्टÑ प्रदेश अध्यक्ष, पंतप्रधान ग्रामसडक योजना कर्मचारी सघटना

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना