शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

 रोहित्राच्या ‘फ्युज बॉक्स’वरून वीज चोरी; महावितरण अनभिज्ञच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 14:01 IST

वाशिम: वीज रोहित्राखालील ‘फ्युज बॉक्स’मध्ये थेट तारा जोडून वीज चोरी करण्याचा घातक प्रकार ग्रामीण भागांत सुरू असल्याचे लोकमतकडून करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाला आहे.

ठळक मुद्दे वीजग्राहकांकडून वीजेच्या चोरीसाठी वेगवेगळे प्रकार अवलंबले जातात. ‘फ्युज बॉक्स’मधूनच वीजेची चोरी करण्याचा प्रकारही होत असल्याची माहिती मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: वीज रोहित्राखालील ‘फ्युज बॉक्स’मध्ये थेट तारा जोडून वीज चोरी करण्याचा घातक प्रकार ग्रामीण भागांत सुरू असल्याचे लोकमतकडून करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाला आहे. महावितरणचे अधिकारी, कर्मचारी या प्रकाराबाबत अनभिज्ञच असल्याचे स्पष्ट होत आहे.वारेमाप वीज वापरासाठी देयके अदा करण्याची गरज पडू नये म्हणून वीजग्राहकांकडून वीजेच्या चोरीसाठी वेगवेगळे प्रकार अवलंबले जातात. यामध्ये खांबावरील वीज तारांवर आकडे टाकणे, वीज मीटरमध्ये बदल करणे किंवा मीटर बायपास करून वीज वापरण्याच्या प्रकाराचा सहसा समावेश आहे; परंतु जिल्ह्यातील काही भागांत थेट वीज रोहित्राखाली सताड उघडे ठेवण्यात येत असलेल्या ‘फ्युज बॉक्स’मधूनच वीजेची चोरी करण्याचा प्रकारही होत असल्याची माहिती मिळाली. याची पडताळणी करण्यासाठी लोकमतच्यावतीने काही ठिकाणी स्टिंग आॅपरेशन राबविण्यात आले. त्यात शेतशिवारात असलेल्या आणि झाडाझुडपांमुळे न दिसणाºया रोहित्राखालील ‘फ्युज बॉक्स’मध्ये तारा जोडून वीज चोरी करण्यात येत असल्याचे दिसून आले. महावितरणच्या ठायी ही केवळ चोरी असली तरी, यामुळे अपघात घडून जिवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. तथापि, महावितरण या प्रकाराबाबत अनभिज्ञच असल्याचे दिसत आहे.

वीजचोरी प्रकरणी मोहिम राबविली जात आहे. वीजचोरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.-व्ही.बी. बेथारिया, अधीक्षक अभियंता, वाशिम

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण