शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूरात ‘जनरेटर’व्दारे वीज घेवून ‘ब्रॉडबॅन्ड’ सेवा होणार पुर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 15:33 IST

शिरपूर जैन (वाशिम) : ‘बीएसएनएल’वर वीज कपातीची नामुष्की!’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १९ फेब्रूवारीच्या अंकात प्रकाशित केलेल्या वृत्ताची तडकाफडकी दखल घेत ‘जनरेटर’साठी लागणारे डिझल उपलब्ध करून देवून विस्कळित झालेली सेवा सुरळित केली जाईल, अशी ग्वाही ‘बीएसएनएल’चे वाशिम जिल्हा प्रबंधक संजय चैताने यांनी दिली

शिरपूर जैन (वाशिम) : ‘बीएसएनएल’वर वीज कपातीची नामुष्की!’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १९ फेब्रूवारीच्या अंकात प्रकाशित केलेल्या वृत्ताची तडकाफडकी दखल घेत ‘जनरेटर’साठी लागणारे डिझल उपलब्ध करून देवून विस्कळित झालेली सेवा सुरळित केली जाईल, अशी ग्वाही ‘बीएसएनएल’चे वाशिम जिल्हा प्रबंधक संजय चैताने यांनी दिली असून महत्वाच्या कार्यालयांचा प्रश्न यामुळे निकाली निघणार आहे. शिरपूर येथील ‘बीएसएनएल’च्या कार्यालयाकडे वीज वितरण कंपनीचे गेल्या चार महिन्यांपासूनचे ६९ हजारांचे वीज देयक थकीत आहे. ते अदा न केल्याने अखेर १८ फेब्रूवारीला महावितरणने ‘बीएसएनएल’च्या कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित केला. यामुळे गावातील बँक आॅफ महाराष्ट्र, जनता कमर्शियल बँक, दुय्यम निबंधक कार्यालय, सेतू सुविधा केंद्रासह अन्य ठिकाणची ‘ब्रॉडबॅन्ड’ सेवाही ठप्प झाल्याने नागरिकांसह अधिकारी व कर्मचारीही त्रस्त झाले. यासंबंधी ‘लोकमत’ने १९ फेब्रूवारीच्या अंकात सर्वंकष वृत्त प्रकाशित केले. त्याची तडकाफडकी दखल घेण्यात आली असून विद्यूत देयक भरण्यासाठी आर्थिक तरतूद नसली तरी ‘जनरेटर’साठी लागणारे डिझल उपलब्ध करून देवून किमान शिरपूर येथील सर्व बँका, दुय्यम निबंधक कार्यालय, सेतू सुविधा केंद्रातील इंटरनेट सुविधा सुरळित करून दिली जाईल, अशी ग्वाही ‘बीएसएनएल’चे वाशिम जिल्हा प्रबंधक संजय संजय चैताने यांनी दिली.  ‘बीएसएनएल’च्या कार्यालयांना माहेवारी मिळणारे वीज देयक अदा करण्यासाठी आर्थिक तरतूद नसल्याने देयक अदा करणे कठीण होत आहे. याबाबत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला असून तुर्तास ‘जनरेटर’साठी लागणारे डिझल उपलब्ध करून देत शिरपूरकरांचा प्रश्न सोडविला जाणार आहे.- संजय चैताने, जिल्हा प्रबंधक, बीएसएनएल, वाशिम

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन