शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यूत पुरवठा खंडित; शिरपूर येथील पाणी पुरवठा सातव्या दिवशीही ठप्पच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 15:33 IST

३१ लाखांचे देयक ग्रामपंचायतीकडे थकीत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : येथील ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा अडोळ प्रकल्पावरील विद्यूत पुरवठा थकीत देयकापोटी महावितरणने सोमवार, ३ फेब्रूवारी रोजी खंडित केला. तेव्हापासून आजपर्यंत (९ फेब्रूवारी) देयक अदा न केल्याने सातव्या दिवशीही गावचा पाणीपुरवठा ठप्पच होता. यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट होत असून नियमित कर अदा करणाऱ्यांचीही यामुळे गैरसोय होत असल्याने त्यांच्यातून नाराजीचा सूर उमटत आहे.१७ हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या शिरपूर जैन या गावातील नागरिकांना अडोळ प्रकल्पावरून पाणीपुरवठा केला जातो. या प्रकल्पावर एक्सप्रेस फिडर कार्यान्वित असून त्याचे ३१ लाखांचे देयक ग्रामपंचायतीकडे थकीत आहे. दुसरीकडे गावातील लोकांकडे सुमारे ८० लाखांचा कर थकीत असल्यामुळे ग्रामपंचायतीला विज पुरवठ्याचे देयक अदा करणे अशक्य झाले आहे. परिणामी, पुरेसा वेळ देऊनही देयक अदा न केल्याने महावितरणने ३ फेब्रूवारी रोजी एक्सप्रेस फिडरचा विद्यूत पुरवठा खंडित केला. तेव्हापासून आजपर्यंत ७ दिवसाचा कालावधी होऊनही हा तिढा न सुटल्याने पाणीपुरवठा अद्याप ठप्पच असून शिरपूरकरांवर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ ओढवली आहे. गावातील काही लोकांनी त्यावर पर्याय म्हणून स्वत:च्या कुपनलिका खुल्या करून दिल्या आहेत. त्यावरून नागरिक पाण्याची गरज भागवत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, गावकऱ्यांनी त्यांच्याकडे थकीत असलेला कर अदा करावा आणि ग्रामपंचायतीनेही महावितरणचे थकीत देयक अदा करून पाणीपुरवठा सुरळित करावा, अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून जोर धरत आहे.

पाणी पट्टी वसूलीतूनच वीज पुरवठ्याचे देयक अदा करावे लागते. त्याशिवाय इतर कुठलीही तरतूद नसल्याने ग्रामस्थांनी त्यांच्याकडे असलेला कर विनाविलंब अदा करायला हवा. कर्मचाºयांकडून त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला; मात्र विशेष फायदा झाला नाही. त्यामुळेच हा प्रश्न उद्भवला आहे.- बी.पी. भुरकाडेग्रामविकास अधिकारी, शिरपूर जैन

टॅग्स :Shirpur Jainशिरपूर जैनwashimवाशिमmahavitaranमहावितरण