शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुऱ्हा वीज उपकेंद्राचे लोकार्पण रखडले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 14:18 IST

वीज उपकेंद्राचे कामही करण्यात आले आणि या उपकेंद्राचे कामकाज चालविण्यासाठी प्रशस्त अशी इमारतही उभारण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कभर जहॉगिर (वाशिम ): रिसोड तालुक्यातील कुऱ्हा येथे परिसरातील गावच्या ग्रामस्थांच्या वीजसमस्या सोडविण्यासाठी वीज उपकेंद्राची उभारणी करण्यात आली, तसेच कार्यालयीन कामकाजासाठी प्रशस्त, अशी इमारतही लाखो रुपये खर्चून उभारण्यात आली. तथापि, लोकार्पण रखडल्यामुळे त्याचा लाभ अद्यापही ग्रामस्थांना झालेला नाही. रिसोड तालुक्यातील अति दुर्गम व दुर्लक्षित भाग असलेल्या कुºहा परिसरातील गावांत राहणाºया ग्रामस्थांना विजेअभावी विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. या भागांत होणारा वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने ग्रामस्थांना अनेक रात्री अंधारात चाचपडत काढाव्या लागल्या. स्थानिक लोकप्रतिनीधींनी या समस्येबाबत  वारंवार पाठपुरावा केल्यानंतर या भागातील २० गावांची ही समस्या लक्षात घेऊन शासनाने येथे वीज उपकेंद्राच्या निर्मितीस मंजुरी दिली. त्यानंतर वीज उपकेंद्राचे कामही करण्यात आले आणि या उपकेंद्राचे कामकाज चालविण्यासाठी प्रशस्त अशी इमारतही उभारण्यात आली.  या वीज उपकेंद्रामुळे परिसरातील २० गावांत राहणाºया शेकडो कुटुंबाची विजेची समस्या सुटणार आहे. तथापि, या उपकें द्राचे लोकार्पण रखडले आहे. त्यामुळे या वीज उपकें द्राचा लाभ अद्यापही ग्रामस्थांना मिळू शकलेला नाही. महावितरणने याची दखल घ्यावी, अशी मागणी या वीज उपकेंद्रावर वलंबून असलेल्या २० गावांतील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. 

काही तांत्रिक कामकाजामुळे लोकापर्ण होऊ शकलेले नाही. ही प्र्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच या उपकेंद्राच्या लोकार्पणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.- आर. जे. तायडे कार्यकारी अभियंतामहावितरण, वाशिम

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण