मालेगाव : राज्य सरकारवरील कर्ज वाढले आहे ,पण ते फेडण्याची क्षमता वाढत असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक यांनी केले . ते ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मालेगाव शहरातील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत बोलत होते .
यावेळी जि .प. सदस्य शाम बढे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा कृउबासचे संचालक गोपाल पाटील राऊत , कृउबासचे माजी उपसभापती प्रा आंनद देवळें , जिल्हा सरचिटणीस संदीप पिंपळकर , नगरसेवक किशोर महाकाळ ,शहर अध्यक्ष मनोज काबरा ,तालुका सरचिटणीस दीपक आसरकर ,विस्तारक रमेश खोबरे , आदी उपस्थित होते .
यावेळी पाठक म्हणाले की, राज्य शासनावर कर्जार्चा बोझा वाढला आहे . सध्या राज्यावर ४ लक्ष हजार कोटी रुपये कर्ज आहे .विकासकामांसाठी कर्ज काढावे लागते ते कर्ज फेडण्यासाठीची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे .नोटांबंदीमुळे रियलइस्टेट मध्ये मंदी आलेली आहे , ही चांगली गोष्ट आहे .हे सरकारचे यश आहे .त्याचे चांगले परिणाम होणार आहेत .राज्यात फडणवीस शासनाने ३४ हजार कोटींची कर्जमाफी केली .शेतकºयांसाठीच्या खर्चावर अर्थसंकल्पात वाढ केली .३५ लाख टी. एम. सी. एवढी जलासाठ्यात वाढ झाली . १.५ लाख कृषी पंप जोडणी केल्या . राज्यात २१०० हवामान केंद्रे सुरू करण्यात आली आहेत .विजेमध्ये राज्य स्वंयपूर्ण आहे .कृषीपंपाना सौर ऊर्जा पुरविण्यात येणार असूनख् राज्यात विदेशी गुंतवणूक वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले.