शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

Positive Story : सैनिकांनी उचलला कोेरोना बाधितांवरील उपचाराचा खर्च 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 12:26 IST

Soldiers pick up treatment costs for Corona victims : शेलु बु. येथील सैनिक (जवान) एकवटले असून, कोरोनाबाधितांवरील उपचाराचा सर्व खर्च त्यांनी उचलला आहे.

- गजानन गंगावणेलोकमत न्यूज नेटवर्कदेपूळ :   ‘गाव करी ते राव न करी’ याची प्रचिती वाशिम तालुक्यातील शेलु बु. येथे येत आहे. गावातील सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांवर गावातच उपचार मिळावे या उद्देशातून शेलु बु. येथील सैनिक (जवान) एकवटले असून, कोरोनाबाधितांवरील उपचाराचा सर्व खर्च त्यांनी उचलला आहे. एवढेच नव्हे तर आवश्यक ती औषधेदेखील उपलब्ध करून दिली आहे.सध्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होत आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडसाठी वेटिंगवर राहण्याची वेळ येत आहे. ही परिस्थिती पाहून गावातील रुग्णांवर पहिल्याच टप्प्यातच योग्य उपचार मिळावे यासाठी शेलु. बु. येथील सर्व सैनिक एकवटले असून, त्यांनी उपचार व औषधीचा खर्चही उचलला आहे. लवकर निदान व उपचारामुळे रुग्ण लवकर बरा होऊ शकतो, हे यापूर्वी अनेकवेळा सिद्ध झाले आहे. त्यामुळे सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी गावातच आरोग्य उपकेंद्रात सुविधा उपलब्ध केली आहे. गावातील आठ सैनिक, इतर अधिकारी, सरपंच यांनी समन्वयातून कोरोना रुग्णांबरोबरच इतर रुग्णांनादेखील गावातच मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी एका खासगी डॉक्टरची सेवा घेण्यात येत आहे. दिमतीला आरोग्य कर्मचारीदेखील आहेत. सैनिक असलेले देवानंद गुट्टे, भागवत दमगीर, पंडित तडसे, अनिल उमाळे, राजू तडसे, विठ्ठल ठाकरे, अजय गावंडे,  करण कदम, गजानन ठाकरे यांच्यासह ग्रामविकास अधिकारी राहुल उंद्रे, सरपंच तूषणा देवानंद गुट्टे आदींनी पुढाकार घेत कोरोना रुग्णांना मानसिक व आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न चालविला आहे. गावातील डॉ. श्याम रेखडे यांच्यासह आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी हे रुग्णांवर देखरेख ठेवून आहेत. सध्या दहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनसह आवश्यक त्या औषधांचा खर्चही सैनिकांनी उचलला आहे. गावात औषधांचा साठादेखील उपलब्ध करून दिला आहे. 

कोरोना संकट काळात आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्याची हीच वेळ आहे, या उद्देशाने प्रेरित होऊन शेलू बु. येथील सैनिकांनी व इतर प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी लोकसहभागातून गावातील रुग्णांना गावातच मोफत उपचाराची सुविधा करून देण्याचे कार्य करण्याची संधी मिळाली, हे आमचे भाग्य समजतो. देशाची सेवा करीत असताना जन्मभूमीचे ऋण फेडण्याची संधी मिळाली.-देवानंद गूट्टे, सैनिक शेलु बु.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस