शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी कार्यान्वित झाले ‘पोर्टल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 15:34 IST

मालेगाव (वाशिम) : तांत्रिक कारणांमुळे ज्या शिक्षकांना यापुर्वी आंतरजिल्हा बदली मिळाली नाही किंवा जे शिक्षक अर्ज करू शकले नाहीत, अशा शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून यासाठी स्वतंत्र ‘पोर्टल’ कार्यान्वित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा दुसरा टप्पा राबविण्यास ग्रामविकास मंत्रालयाने हिरवी झेंडी दिली; परंतु त्यात अनेक त्रुट्या असल्याने शेकडो शिक्षक या प्रक्रियेपासून वंचित राहण्याची भिती होती. प्रधानसचिव असिम गुप्ता यांनी ही प्रक्रिया पुन्हा एकवेळ राबविण्यास मान्यता दिली आहे. १५ फेब्रुवारीपासून सदर पोर्टल सुरू करण्यात आले असून ते २१ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.यापूर्वी १ फेब्रुवारीपासून आंतरजिल्हा बदलीकरिता सुरू होणारे पोर्टल प्रहार शिक्षक संघटनेच्या काही मागण्यांकरीता थांबविण्यात आले.

मालेगाव (वाशिम) : तांत्रिक कारणांमुळे ज्या शिक्षकांना यापुर्वी आंतरजिल्हा बदली मिळाली नाही किंवा जे शिक्षक अर्ज करू शकले नाहीत, अशा शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून यासाठी स्वतंत्र ‘पोर्टल’ कार्यान्वित करण्यात आले आहे. १५ फेब्रुवारीपासून पुन्हा एकवेळ यासंदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा दुसरा टप्पा राबविण्यास ग्रामविकास मंत्रालयाने हिरवी झेंडी दिली; परंतु त्यात अनेक त्रुट्या असल्याने शेकडो शिक्षक या प्रक्रियेपासून वंचित राहण्याची भिती होती. त्याची दखल घेत आमदार बच्चू कडू आणि प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी ग्रामविकासच्या प्रधानसचिवांशी संपर्क करून आंतरजिल्हा बदलीपासून अद्याप वंचित, प्रस्तावांमध्ये दुरूस्ती आणि बदलीस नकार अशा घटकांतर्गत शिक्षकांना दुसºया टप्प्यात संधी देण्यात यावी, अशी मागणी लावून धरली होती. त्यानुसार, प्रधानसचिव असिम गुप्ता यांनी ही प्रक्रिया पुन्हा एकवेळ राबविण्यास मान्यता दिली आहे. १५ फेब्रुवारीपासून सदर पोर्टल सुरू करण्यात आले असून ते २१ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात येईल. यापूर्वी १ फेब्रुवारीपासून आंतरजिल्हा बदलीकरिता सुरू होणारे पोर्टल प्रहार शिक्षक संघटनेच्या काही मागण्यांकरीता थांबविण्यात आले. त्यात प्रामुख्याने पुर्वीच्या अर्जांमध्ये दुरुस्ती, अर्ज करण्यास वंचित शिक्षकांना एक संधी तसेच न्यायालयीन प्रकरणांची पुर्तता या व इतर मागण्यांचा समावेश होता. यातील दुरुस्ती, नकार व वंचितांमधील ड्रॉपबॉक्समधील अर्जाचा समावेश आंतरजिल्हा बदलीच्या दुसºया टप्प्यात करण्यात आला असून पहिल्या टप्प्यातील न्यायालयीन प्रकरणाचा निपटारा देखील करण्यात येणार आहे. मात्र, यातील इतर वंचित शिक्षकांना अर्ज करण्यास संधी ही प्रक्रियेच्या आरंभी पूर्ण होऊ शकली नव्हती, पण याविषयी संघटनेने आग्रही भूमिका मांडल्यानंतर अर्ज करण्यापासून वंचित शिक्षकांना संधी देण्यात आली. या निर्णयामुळे शेकडो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक