शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल ठप्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 18:08 IST

सोमवार २ मार्च रोजी प्रमाणिकरणासाठी शेंदुरजना येथील आपले सरकार केंद्र व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत शेकडो शेतकरी ताटकळत बसले होते

शेंदुरजना आढाव (वाशिम): महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल ठप्प झाल्यामुळे कर्जमुक्ती मिळालेल्या लाभार्थींना आपले आधार क्रमांक आणि इतर माहिती भरून प्रमाणिकरण करून घेण्यात अडचणी येत आहेत. सोमवार २ मार्च रोजी प्रमाणिकरणासाठी शेंदुरजना येथील आपले सरकार केंद्र व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत शेकडो शेतकरी ताटकळत बसले होते. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत विविध अडचणींमुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला असताना या योजनेच्या लाभार्थींची पहिली यादी ग्रामपंचायत कार्यालय, आपले सरकार सेवा केंद्रांत झळकल्यानंतर शेतकºयांना दिलासा मिळाला आणि या योजनेंतर्गत आधार प्रमाणिकरणासह इतर माहिती भरण्यासाठी शेतकºयांची लगबग सुुरु झाली; परंतु शेंदुरजना येथे या प्रक्रियेसाठी शेकडो शेतकरी दाखल झाले असताना योजनेचे पोर्टल ठप्प झाल्याने शेतकºयांना दिवसभर आपले सरकार सेवा केंद्रासह बँकेच्या शाखेत ताटकळत बसावे लागले. पोर्टल ठप्प असल्याने शेतकºयांसह आपले सरकार केंद्रातील संगणक चालक आणि बँकेच्या कर्मचाºयांनाही अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, शेंदुरजना येथे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात जिल्हा व तहसील प्रशासनासह जिल्हा मध्यवर्ती बँक शेंदुरजना (अ) च्या शाखेकडून शेतकºयांचे आधार क्रमांक प्रामाणिकरण करण्यासाठी विशेष शिबिराचेही आयोजन केले; परंतु पोर्टल ठप्प असल्याने त्याचा काहीच फायदा झाला नाही.

टॅग्स :washimवाशिम