शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड येथे सुजलाम, सुफलाम अंतर्गत तलावातील गाळ उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 16:48 IST

रिसोड (वाशिम) : राज्यशासन आणि भारतीय जैन संघटनेच्यावतीने (बीजेएस) राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत रिसोड शहरालगत पिंगलाक्षी देवी संस्थान जवळ असलेल्या तलावातील गाळ उपशाच्या कामाला ३ मार्च रोजी प्रारंभ करण्यात आला.

 लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड (वाशिम) : राज्यशासन आणि भारतीय जैन संघटनेच्यावतीने (बीजेएस) राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत रिसोड शहरालगत पिंगलाक्षी देवी संस्थान जवळ असलेल्या तलावातील गाळ उपशाच्या कामाला ३ मार्च रोजी प्रारंभ करण्यात आला. रिसोडचे तहसीलदार आर. यू. सुरडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत जिल्हाभरात सीसीटी, डीपसीसीटी, सिमेंट नाला बांध खोलीकरण, नाला खोलीकरण, नदी खोलीकरण, ढाळीचे बांध आणि साठवण तळ्यांची कामे करण्यात येत आहेत. आता या अभियानांतर्गत जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या प्राचीन आणि बुजत चाललेल्या जलस्त्रोतातील गाळाचा उपसा करून खोली वाढविण्याचे काम होणार आहे. सर्वप्रथम रिसोड तालुक्यात हे काम हाती घेण्यात आले असून, निजामपूर ग्रामपंचायतच्या पुढाकारातून पिंगलाक्षी देवी मंदिराजवळील तलावातील गाळ उपशाला रविवारी प्रारंभ करण्यात आला. या तलावातून निघालेला गाळ शेतकºयांना मोफत देण्यात येत असून, पहिल्याच दिवशी ४० शेतकºयांनी या तलावातील गाळ शेतात टाकण्यासाठी नेला. शेतकºयांनी केवळ ट्रॅक्टर आणून हा गाळ घेऊन जावा, असे आवाहन तहसीलदार सुरडकर आणि निजामपूरच्या सरपंचांंनी केले आहे. या तलावाच्या खोलीकरणामुळे रिसोड शहरासह, कंकरवाडी, निजामपूर या गावांतील भुजल पातळी वाढणार आहे. या कामाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार आर.यू. सुरडकर, निजामपुरचे सरपंच डिगांबर जाधव, नगरसेवक पवन छित्तरका, अ‍ॅड.कृष्णा आसनकर, सुभाष चोपडे, माजी नगर सेवक सतिश इरतकर, दिपक वर्मा, विष्णू कदम, बीजेएस रिसोडचे अध्यक्ष बाहुबली सराफ, उपाध्यक्ष संजय काळे, किशोरकुमार महाजन, सुरेश काळे, अनिल धोतरकर, विनोद पंचवाटकर, संदीप कुरकुटे, निलेश महाजन, राहुल मेण यांची उपास्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अविनाश सोनूने आदिंची उपस्थिती होती. या तलावातून निघालेला गाळ शेतकºयांना मोफत देण्यात येत असून, पहिल्याच दिवशी ४० शेतकºयांनी या तलावातील गाळ शेतात टाकण्यासाठी नेला. शेतकºयांनी केवळ ट्रॅक्टर आणून हा गाळ घेऊन जावा, असे आवाहन तहसीलदार सुरडकर आणि निजामपूरच्या सरपंचांंनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड