शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी शेतकऱ्याने तोडली डाळींबाची झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 17:48 IST

येथील अनंता कुटे नामक शेतकºयावर एका एकरातील डाळींबांची झाडे तोडण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमूंगळा (वाशिम) : सततची नापिकी, तीन वर्षांपासून कमी झालेले पर्जन्यमान, उत्पन्नापेक्षा लागवड व संगोपन खर्च जास्त आदी कारणामुळे मुंगळा येथील अनंता कुटे नामक शेतकºयावर एका एकरातील डाळींबांची झाडे तोडण्याची वेळ आली आहे. डाळींबाच्या ३५० पैकी आतापर्यंत १२५ च्या आसपास झाडे तोडली असून, अद्याप कृषी किंवा महसूल यंत्रणेने पंचनामा केला नाही.मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील शेतकºयांनी पारंपारिक पिकांबरोबरच संत्रा, डाळींब या फळबागेलाही प्राधान्य दिले आहे. येथील अल्पभूधारक शेतकरी अनंता कुटे यांनी सहा, सात वर्षांपूर्वी एका एकरात डाळींबाची जवळपास ३५० झाडांची लागवड केली होती. विदर्भ कोकन ग्रामीण बँकेचे वैयक्तीक सर्वांच्या नावावर दीड लाख रुपये कर्ज काढुन विहीर व एक एकरावर डाळीबांची ३५० झाडांची लागवड केली. पहिल्या एक, दोन वर्षी बºयापैकी उत्पादन आले. पण कमी बाजारभावामुळे लागवड खर्च वजा जाता जेमतेम उत्पन्न मिळाले. डाळींबाची झाडे डोलदार असल्यामुळे हिम्मत न हरता त्यांनी वाटचाल ठेवली. गत तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्याने डाळींब बाग जगविण्याची कसरत कुटे यांना करावी लागत आहे. प्रकल्प व धरणातही पाणी नसल्याने सुरूवातीच्या काळात टँकरने पाणी देऊन डाळींब बाग जगविण्याचा प्रयत्न केला. परंतू, उत्पन्नापेक्षा संगोपन खर्च जास्त येत असल्याने कुटे यांच्यापुढे आर्थिक पेच निर्माण झाला. डाळींब बाग जगविण्यासाठी शासनाने अर्थसहाय्य करावे, अशी मागणी अनेक महिन्यांपासून करण्यात आली. मात्र, अद्याप याकडे शासन, प्रशासनाने लक्ष दिले नाही, असे अनंता कुटे यांनी सांगितले. यावर्षी भीषण पाणीटंचाई असल्यामुळे झाडाला फारशी फळधारणा झाली नाही. एप्रिल महिन्यापासून विहिर व बोअरवेलचे पाणी कमी झाल्याने आणि सिंचनाचा दुसरा कोणताही पर्याय नसल्याने नाईलाजास्तव डाळींबांची झाडे तोडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे कुटे यांनी सांगितले. आतापर्यंत जवळपास १२५ झाडे तोडली असून, कृषी किंवा महसूल विभागाने अद्याप पंचनामा केला नाही, असा दावाही कुटे यांनी केला. शासनाने नुकसानभरपाई द्यावी, फळबाग उत्पादक शेतकºयांना अनुदान द्यावे, अशी मागणीही कुटे सोमवार, २० मे रोजी यांनी केली.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी