शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नवीन मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 16:45 IST

पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी शुक्रवारी झालेल्या राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, ३० जुलै २०१९ पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत मतदार यादीमध्ये नाव नोंदविता येणार आहे तसेच मतदार यादीतील दुरुस्ती, सुधारणाही करता येणार आहे. या मोहिमेदरम्यान प्रत्येक पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी शुक्रवारी झालेल्या राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत केले.यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, नायब तहसीलदार पाटील यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मोडक म्हणाले, विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी २० व २१ जुलै आणि २७ व २८ जुलै २०१९ रोजी या शासकीय सुट्टीच्यादिवशी विशेष मोहीम राबविली जाणार आहे.  यादिवशी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांना मतदान केंद्रावर उपस्थित राहून नवीन मतदार नोंदणी, नावातील किंवा पत्त्यामधील चुकांची दुरुस्ती यासह दुबार नावे, मयत मतदारांची नावे वगळणे आदीसाठीचे अर्ज स्वीकारण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी आपले नाव मतदार यादीत असले तरी अथवा यापूर्वी आपण मतदान केले असले तरी प्रत्येक मतदाराने आपले नाव प्रारूप मतदार यादीत आहे का, हे तपासावे. या मतदार यादीत नाव नसल्यास नवीन अर्ज भरून देवून आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. तसेच १ जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अथवा तहसीलदार कार्यालयात अर्ज सादर करावा.  जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधींनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व पात्र मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये नोंदविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मोडक यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमcollectorजिल्हाधिकारी