शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मेडशी येथे पोलीस बंदोबस्त; पोलिस अधीक्षकांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 10:48 IST

पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी मेडशीचा आढावा घेतला असून, कुणीही घराबाहेर पडू नये, अशा सूचना दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कमेडशी : मेडशी येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने गाव सील केले असून, रुग्ण आढळून आलेल्या भागात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले. ६ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी मेडशीचा आढावा घेतला असून, कुणीही घराबाहेर पडू नये, अशा सूचना दिल्या.कोरोना विषाणू संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता मेडशी गावावर आरोग्य विभागासह पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. ३ एप्रिलपासून घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांच्यावतीने सर्वे केला जात असून, सुरक्षिततेचा उपाय म्हणून घरातच थांबण्याच्या सूचना दिल्या. मेडशी येथे निर्जंतुकीकरण केले असून, गावात तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष बोरसे, तालुका समूह संघटक मोहम्मद नूर, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक मोहम्मद अनिस कुरेशी, फड, संतोष घूले, आरोग्य सेविका बोदवडे, आशा स्वयंसेविका प्रमिला राठोड, विद्या चव्हाण, कांचन सावळे, मीनाक्षी पट्टेबहादूर आदींनी गावकºयांची माहिती संकलित केली. दुसरीकडे गावातून बाहेर कुणी जाणार नाही यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. रुग्ण आढळून आलेला तो भाग सील करण्यात आला असून, तेथे पोलीस कर्मचारी तैनात केले. येथे खडा पहारा दिला जात आहे. घराबाहेर पडल्यास पोलीस कारवाईमेडशी गावातील परिस्थिती लक्षात घेता प्रत्येकाला घरातच राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. याऊपरही कुणी घराबाहेर पडून गर्दी करीत असेल तर पोलीस प्रशासनातर्फे कारवाई केली जाणार आहे. कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये अन्यथा पोलीस कारवाईला सामोरे जा, असा इशारा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या