शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
2
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
3
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
4
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
5
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
6
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
7
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
8
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
9
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स
10
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
11
तुम्ही देखील सोने-चांदी खरेदी करुन घरात ठेवलंय? CA नितीन कौशिक म्हणतात ही गुंतवणूक नाही तर...
12
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण 
13
Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत?
14
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
15
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
16
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
17
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
18
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
19
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
20
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक

पोलिसांनी कारंजात पकडले ६४ ऑक्सिजन सिलिंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 12:27 IST

Police seized 64 oxygen cylinders : ऑक्सिजन सिलिंडर तसेच एक पिकअप व एक ट्रक असा एकूण १६  लाख ९७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : एकिकडे बाधितांसह कुटुंबियांची ऑक्सिजन सिलिंडरसाठी धावपळ होत असताना, दुसरीकडे ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करणारे वाहन संशयास्पदरित्या आढळल्याचा प्रकार कारंजा शहरात सोमवारी उघडकीस आला. पोलिसांनी ५५ भरलेले व ९ रिकामे ऑक्सिजन सिलिंडर तसेच एक पिकअप व एक ट्रक असा एकूण १६  लाख ९७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. नागपूर-औरंगाबाद शीघ्रगती मार्गावरील कारंजा येथील यशोतिरथ काॅलनीमधील महाराष्ट्र नगरातील एका ठिकाणी संशयितरित्या एका पिकअपमधून ट्रकमध्ये ऑक्सिजन सिलिंडर भरले जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने वाशिम गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता, याठिकाणी (एमएच २९ एटी  ०८१८) क्रमांकाच्या पिकअपमधून (एमएच २१, ६००१) क्रमांकाच्या ट्रकमध्ये काहीजण ऑक्सिजन सिलिंडर भरताना दिसून आले. याबाबत खात्री केली असता, पिकअपमध्ये २९, ट्रकमध्ये २६ तर संबंधित दुकानात ९ रिकामे सिलिंडर  आढळले. दुकानमालक रियाज अहेमद गुलाम रसुल (४०, रा. झोया नगर, कारंजा) यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांच्याकडे सिलिंडर व्यवसायाचा परवाना असून, हा परवाना न्यू हिंदूस्थान एजन्सी, नागपूर-औरंगाबाद हायवे, महाराष्ट्र नगर, कारंजा या नावे असल्याचे दिसून आले. तसेच सिलिंडरबाबत विचारणा केली असता, त्यांनी हे सिलिंडर नागपूर येथून खरेदी केल्याचे सांगितले. कागदपत्रांची विचारणा केली असता, हे सिलिंडर जवाहर हाॅस्पिटल, कारंजाच्या नावे खरेदी केल्याचे दिसून आले. यावेळी अधिक विचारपूस केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे ५५ भरलेले व ९ रिकामे ऑक्सिजन सिलिंडर तसेच एक पिकअप व एक ट्रक असा एकूण १६ लाख ९७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, हा मुद्देमाल कारंजा शहर पालीस स्थानकात जमा करण्यात आला आहे. या कारवाईचा जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर, अजय वाढवे, किशोर चिंचोडकर, अमोल इंगोले, मुकेश भगत, प्रवीण राऊत व राम नागुलकर यांनी केली. याप्रकरणी पोलिसांकडून पुढे काय कारवाई केली जाते, याकडे कारंजावासीयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :KaranjaकारंजाOxygen Cylinderऑक्सिजन