शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनीप्रदुषणावर पोलिसांचा राहणार 'वॉच'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 12:07 IST

जिल्ह्यात ध्वनीप्रदूषण नियंत्रण करण्यासाठी पोलीस विभागाने १६ ध्वनीप्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी पोलीस विभागाने १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त केले तसेच जिल्हास्तरावर सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत असल्यास याबाबतची माहिती संबंधित प्रदूषण नियंत्रण अधिकारी, प्राधिकारी यांना द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी १० आॅगस्ट रोजी केले.ध्वनी प्रदुषणावर वॉच राहावा म्हणून उपविभागीय तसेच पोलीस स्टेशन स्तरावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी म्हणून वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी पवन बन्सोड, वाशिम शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज, वाशिम ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय शिंपणे, रिसोडचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, मालेगावचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, शिरपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे, मंगरूळपीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, मंगरूळपीरचे पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे, अनसिंगचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तसरे, आसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी लष्करे, जऊळकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळू जाधवर, कारंजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक सतीश पाटील, कारंजा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शेंबळे, मानोराचे पोलीस निरीक्षक शिशिर मानकर, धनजचे पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे या पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ध्वनी प्रदुषण होत असल्यास माहिती देण्याचे आवाहन वसंत परदेशी यांनी केले. अशी आहे जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीजिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण असून गृह शाखेचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक श्रीराम घुगे हे सदस्य व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी हे सचिव आहेत. ध्वनी प्रदूषण तक्रारीकरिता नागरिक पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक ११२ या क्रमांकावरही संपर्क करू शकतात. तसेच ८६०५८७८२५४, ८६०५१२६८५७ या क्रमांकावर एसएमएस पाठवू शकतात, असे जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमpollutionप्रदूषण