शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

लोकप्रतिनिधींना समजपत्र देणे शिरपूरच्या ठाणेदारास भोवणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 12:08 IST

माहिती प्रशासकीय विभागाव्दारे अवगत करण्याऐवजी शिरपूरच्या पोलिस निरीक्षकांनी उलटपक्षी शर्मा यांनाच २० मे २०१९ रोजी समजपत्र दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सर्वसामान्य जनतेस नाहक त्रास देणारे पोलिस शिपाई संतोष पाईकराव यांची बदली करण्याबाबत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य गोवर्धन शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला. त्याची माहिती प्रशासकीय विभागाव्दारे अवगत करण्याऐवजी शिरपूरच्या पोलिस निरीक्षकांनी उलटपक्षी शर्मा यांनाच २० मे २०१९ रोजी समजपत्र दिले. दरम्यान, लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीवर त्यांनाच समजपत्र देण्याची ही पहिलीच घटना माझ्या पाहण्यात आली आहे. याची अत्यंत गंभीर दखल घेवून तत्काळ कार्यवाही करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना १८ जून रोजी दिले आहेत. यामुळे लोकप्रतिनिधींना समजपत्र देणे शिरपूरच्या ठाणेदारास भोवणार असल्याचे निश्चित झाले आहे.जिल्ह्यातील शिरपूर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस शिपाई संतोष पाईकराव हे सर्वसामान्य जनता व सामाजिक कार्यकर्त्यांना नाहक त्रास देत असल्याच्या तक्रारीवरून गोवर्धन शर्मा यांनी दुरध्वनीव्दारे शिरपूर पोलिस निरीक्षकांशी अनेकवेळा चर्चा करून पाईकराव यांना समज देण्याबाबत सांगितले. पाईकराव हे तीन वर्षांपासून शिरपूर पोलिस स्टेशनलाच कार्यरत असून हेतुपुरस्सर सामाजिक कार्यकर्त्यांना ‘टार्गेट’ करित आहेत. यासंदर्भात पोलिस अधीक्षकांशीही दुरध्वनीव्दारे संपर्क साधून चर्चा केली. त्याऊपरही पाईकराव यांच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नसल्याने गोवर्धन शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांकडे २० जुलै २०१८ रोजी पत्र पाठवून संबंधित पोलिस शिपायाची बदली करण्याची विनंती केली होती. त्यावर झालेल्या कार्यवाहीबाबत प्रशासकीय विभागाव्दारे आपणास अवगत करणे आवश्यक असताना शिरपूरच्या पोलिस निरीक्षकांनी उलटपक्षी आपणास समजपत्र देवून आपला एकप्रकारे अपमान केला, असे पत्र विधानसभा सदस्य गोवर्धन शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर करून शिरपूरच्या पोलिस निरीक्षकाविरूद्ध कठोर कारवाईची मागणी केली. त्याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत याप्रकरणी तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिले आहेत.

टॅग्स :washimवाशिमGovardhan Sharmaगोवर्धन शर्माPoliceपोलिसShirpur Jainशिरपूर जैन