शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गृह विलगीकारणाचे आदेश न पाळणाऱ्यांवर पोलीस कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 11:05 IST

या संदर्भात संबंधितांना पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यामार्फत लेखी नोटीस बजावली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महानगरातून परत आलेल्या नागरिकांनी पुढील १५ दिवस गृह अलगीकरणात (होम क्वारंटाईन) राहावे, कुटुंबातील व्यक्ती, गावातील नागरिकांशी संपर्क टाळावा आदेश जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी ३१ मार्च रोजी दिले.या संदर्भात संबंधितांना पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यामार्फत लेखी नोटीस बजावली जाणार आहे. तसेच या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही पॉझिटिव्ह अथवा संशयित रुग्ण आढळलेला नाही.जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र, तत्पूर्वी मुंबई, पुणे यासह विविध शहरात, जिल्ह्यात कामानिमित्त गेलेले नागरिक, विद्यार्थी आपल्या गावी परतले आहेत. जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोनाचा रुग्ण नसला तरी बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या एखाद्या व्यक्तीपासून या विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी पुढील काही दिवस खबरदारी घेणे आवश्यक आहे.

पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यावर जबाबदारीसंचारबंदी, लॉकडाऊनमुळे मुंबई, पुणेसह इतर महानगरातून नागरिक, विद्यार्थी जिल्ह्यात परतले आहेत. या सर्व नागरिकांनी १५ दिवस कुटुंबातील तसेच गावातील इतर व्यक्तींच्या संपर्कात न येता घरातच वेगळे राहणे आवश्यक आहे. परंतू अनेक नागरिक व विद्यार्थी हे घरात न राहता गावात फिरत आहेत. अशा सर्व नागरिकांची माहिती पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यामार्फत घेतली जात आहे. ही माहिती तहसीलदार, गट विकास अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा प्रशासनाकडे सादर केली जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम