शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

‘शेतकरी सन्मान’चा निधी अन्य लाभार्थींच्या खात्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 14:30 IST

अचूक बँक खाते व अन्य माहिती दिल्यानंतरही अनुदानाची रक्कम अन्य शेतकरी लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत आधीच विविध तांत्रिक घोळ असल्याने अनेक शेतकरी अद्याप या योजनेपासून वंचित आहेत. त्यातच आता शेतकऱ्यांनी अचूक बँक खाते व अन्य माहिती दिल्यानंतरही अनुदानाची रक्कम अन्य शेतकरी लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या संदर्भात शेतकºयांनी तहसीलस्तरावर तक्रारीही केल्या आहेत.कें द्र शासनाने शेतकºयांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत दरवर्षी शेतकºयाला सहा हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेत आता क्षेत्र मर्यादेची कोणतीही अट नसल्याने सर्व पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाच्या याद्या संकलित करून वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार पीएम किसान पोर्टलवर माहिती अपलोड करण्याची तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी तलाठी अथवा ग्रामसेवकांकडून नोंदणी केली जात आहे. शेतकरी नाव, गाव, वय, व्यवसाय, खाते क्रमांक, क्षेत्र, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक यांसह स्वयंघोषणापत्र भरून तलाठी अथवा ग्रामसेवकाकडे देत आहेत. दरम्यान, हजारो शेतकºयांनी संपूर्ण माहिती तलाठ्यांकडे देऊनही खात्यात निधी जमा झाला नसल्याबाबत चौकशी सुरू केली. त्यावेळी काही शेतकºयांची रक्कम दुसºयाच व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याचे निदर्शनास आले. तलाठ्यांनी भरलेली माहिती अचूक असतानाही हा प्रकार घडत आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडले असून, या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. तक्रारी होऊनही शेतकºयांना मिळाला नाही लाभशेतकरी सन्मान निधीपासून वंचित असल्याने शेतकºयांनी चौकशी सुरू केली असता त्यांची रक्कम दुसºयाच शेतकºयांच्या खात्यात जमा झाली असल्याचे निदर्शनास आले. असा प्रकार घडलेल्या मानोरा तालुक्यातील काही शेतकºयांनी तहसीलदारांकडे तक्रारही केली. आता या तक्रारीला आठवडा उलटत आला तरी, त्यावर कोणतीही कार्यवाही करून शेतकºयांच्या खात्यात रक्कम अद्याप जमा करण्यात आली नाही.

यासंदर्भातील माहिती आपल्याला मिळाली आहे; परंतु खूप कमी शेतकºयांबाबत हा प्रकार घडला आहे. त्यातही अचूक माहिती भरल्यानंतर असा प्रकार घडत नाही. तथापि, या प्रकाराची चौकशी करून तांत्रिक दोष दूर करण्यासह संंबंधित शेतकºयांना त्याचा लाभ देण्यात येणारच आहे.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :washimवाशिमPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरीbankबँक