शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भूर येथील जिल्हा परिषद शाळेला दिली जागा दान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 13:42 IST

शेलूबाजार (वाशिम) : एकिकडे भूखंड, जागा बळकाविल्या जात आहेत तर दुसरीकडे काही सद्गृहस्थ चांगल्या कार्यासाठी जागा दान देत असल्याचेही आशावादी चित्र आहे.

ठळक मुद्देअतुल पाटील देवळे यांनी  स्व.तुकाराम देवळे यांच्या स्मरनार्थ २५०० स्क्वे.फुट जागा शाळेसाठी दान दिली. याच केंद्रातील जिल्हा परिषद शाळा येडशी येथे ७ एकर शेत शाळेला दान देण्याचं प्रस्तावित आहे.

शेलूबाजार (वाशिम) : एकिकडे भूखंड, जागा बळकाविल्या जात आहेत तर दुसरीकडे काही सद्गृहस्थ चांगल्या कार्यासाठी जागा दान देत असल्याचेही आशावादी चित्र आहे. मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा केंद्रांतर्गत येणाऱ्या  भूर येथील जिल्हा परिषद शाळेसमोर असलेली २५०० स्क्वे.फुट जागा दान देऊन अतुल पाटील देवळे यांनी इतरांसमोर आदर्श निर्माण केला. खासगी शाळेच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेत फारशा भौतिक सुविधा उपलब्ध नसतात, अशी नेहमीच ओरड होते. मात्र, याला अपवाद ठरत अनेक जिल्हा परिषद शाळा या खासगी शाळांपेक्षाही सरस ठरत असल्याचे दिसून येते. काही सद्गृहस्थदेखील जिल्हा परिषद शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे आशावादी चित्र आहे. वनोजा केंद्रांतर्गत येणाऱ्या  जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठ गावातील काही सद्गृहस्थांनी जागा दान दिली आहे. ३१ मार्चला मंगरुळपीर पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरीय शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचा सक्षमीकरण मेळावा पार पडला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, तहसिलदार वैशाख वाहुरवाघ, पंचायत समिती सभापती तुळसाबाई आमटे, उपसभापती सुभाष शिंदे व  इतर प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत भुर येथील प्रतिष्ठित नागरिक अतुल पाटील देवळे यांनी  स्व.तुकाराम देवळे यांच्या स्मरनार्थ       २५०० स्क्वे.फुट जागा शाळेसाठी दान दिली. सदर जागेचा आठ- (अ) प्रमुख अतिथिंना सुपुर्द करुन एक आदर्श निर्माण केला. सदर जागा मिळविण्यासाठी मंगरुळपीर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राजेंद्र राऊत, राजु भगत, माजी सरपंच रमेश चौगुले, शाळा समिती अध्यक्ष संतोष खाडे, मुख्याध्यापक दादाराव राऊत, शिक्षक दीपक जायभाये, आकाश देवळे स्वयंसेवक यांनी प्रयत्न केले.वनोजा केंद्रांतर्गत माळशेलु येथे रामचंद्र जावळे यांनी सुध्दा एक हजार स्क्वे.फुट जागा शाळेला दान दिली आहे. तर याच केंद्रातील जिल्हा परिषद शाळा येडशी येथे ७ एकर शेत शाळेला दान देण्याचं प्रस्तावित आहे. हाच आदर्श तालुक्यातील इतर शाळांसाठी सद्गृहस्थांनी घेतला तर जिल्हा परिषद शाळेतही बऱ्यापैकी भौतिक सुविधा उपलब्ध होतील, यात शंका नाही.

वनोजा केंद्रातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शिक्षक, सहकारी व ग्रामस्थांच्या मदतीने शक्य तेवढ्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. याला ग्रामस्थ व शिक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.  - पांडुरंग जायभाये, केंद्रप्रमुख, वनोजा

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा