शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

खेळाडूंचा सराव गवत, झुडपांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 14:45 IST

मंगरुळपीर: तालुक्यातील विद्यार्थी, युवकांच्या क्रीडा गुणांना विकसीत करण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आलेल्या तालुका क्रीडा संकुलाची पार दैना झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: तालुक्यातील विद्यार्थी, युवकांच्या क्रीडा गुणांना विकसीत करण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आलेल्या तालुका क्रीडा संकुलाची पार दैना झाली आहे. येथील धावपट्टीस परिसरात झुडपे आणि गवत मोठ्या प्रमाणात वाढले असून, घाणकचºयाचा विळखाही क्रीडा संकुलास बसला आहे. याच वातावरणात खेळाडू नाईलाजास्तव सराव करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.मंगरुळपीर येथे साधारण २५ वर्षांपूर्वी तालुका क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आली. जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरातील मोकळ्या जागेत भव्य, असे क्रीडा संकुल तयार करण्यात आले. या ठिकाणी २०० मीटरची धावपट्टी आणि मैदानी खेळासाठी सुव्यवस्थीत क्रीडांगण, तसेच इनडोअर खेळांसाठी इमारतीत सोयीसुविधा उभारण्यात आल्या. सुरुवातीची काही वर्षे या क्रीडा संकुलाची नियमित देखभाल होत राहिल्याने तालुक्यातील खेळाडूंच्या क्रीडा गुणांना विकसीत होण्यास फायदा झाला; परंतु मागील काही वर्षांत या क्रीडा संकुलाकडे पार दुर्लक्ष झाले आहे. परिसरात मोठी झुडपे वाढली असून, धावपट्टीसह इतर भागात गवत वाढले असून, घाणकचराही पसरला आहे.  त्यामुळे डासांचा प्रादूर्भाव झाला आहे. याच वातावरणात खेळाडू सराव करीत असल्याचे चित्र दररोज पाहायला मिळते. अशा वातावरणात सराव केल्याने खेळाडूंचे आरोग्यबाधित होऊन त्यांना आजाराची लागण होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या स्पर्धेसाठी सराव करताना असे घडल्यास खेळाडूला स्पर्धेपासून वंचितही राहावे लागणार आहे. रात्रीच्या वेळी मद्यप्राशनाचे प्रकारमंगरुळपीर तालुका क्रीडा संकुल परिसर मोकळाच असल्याने या ठिकाणी रात्रीच्यावेळी शहरातील आंबट शौकिन जुगार खेळण्यासह मद्यप्राशन करीत असल्याचे दिसते. मद्यप्राशन केल्यानंतर दारूव्या बाट्यला फोडून मैदानातच फेकण्यात येतात. त्यामुळे पडलेल्या काचांपासून खेळाडूंना दुखापत होण्याचीही भिती आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर