शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या अस्थी रक्षेवर मुलांनी केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 15:43 IST

रिसोड तालुक्यातील मांडवा येथील गरकळ कुटुंबाने फाटा देत आईच्या निधनानंतर पर्यावरण संवर्धनासाठी एक आगळाच संदेश समाजाला दिला आहे. आईच्या अस्थी शेतात खड्डे खोदून त्यात टाकत त्यावर वृक्षाची लागवड करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड: हिंदू धर्मातील संस्कारानुसार एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंंस्कार उरकून मृत व्यक्तीच्या अस्थींचे नदीपात्रात विर्सजन केले जाते. या परंपरेला रिसोड तालुक्यातील मांडवा येथील गरकळ कुटुंबाने फाटा देत आईच्या निधनानंतर पर्यावरण संवर्धनासाठी एक आगळाच संदेश समाजाला दिला आहे. आईच्या अस्थी शेतात खड्डे खोदून त्यात टाकत त्यावर वृक्षाची लागवड करण्यात आली.रिसोड तालुक्यातील मांडवा गावातील माजी ग्रामपंचायत सदस्या गुंफाबाई माधवराव गरकळ यांचे बुधवार १० जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ६० वर्षीय गुंफाबाई या बुधवारी पहाटेपासून पंढरपुर यात्रेत जाण्याच्या लगबगीत गुंतल्या होत्या.तथापि, त्यांची नेमाने पंढरपूरला जाण्याची इच्छा अपूर्णच राहिली आणि हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. गुंफाबाई गरकळ यांच्या अचानक निधनामुळे त्यांची शालिकराम गरकळ व बद्री गरकळ ही दोन मुले दुखी झाली. तथापि, या दोघा भावांनी आईच्या स्मृती चिरंतर टिकाव्या आणि एक आदर्श संदेश समाजाला मिळावा म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष डॉ.सुरेश गरकळ व सरपंच विजय चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर स्वत:च्या शेतात खड्डे खोदले आणि आईच्या अस्थी खड्ड्यात टाकत त्यावर बेल, आंबा, निंब, जांभुळ व पेरु या पाच वृक्षांची लागवड केली. गरकळ कुटुंबाच्या या उपक्रमामुळे समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण झाला असून, अंधश्रध्देलाही आळा बसण्याचा पायंडा पडला आहे.

जलसंवर्धनाचाही समाजाला संदेशगुंफाबाई यांच्या शालिकराम गरकळ व बद्री गरकळ या दोन मुलांनी आईच्या अस्थीवर वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच जलसंवर्धनाचाही अभिनव संदेश या माध्यमातून दिला आहे. हिंदू संस्कृतीत मृत व्यक्तीच्या अस्थींचे जलविसर्जन होत नाही, तोवर मृतात्म्याला शांती मिळत नाही, असा समज आहे. तथापि, यामुळे जलस्त्रोताील पाणी दुषित होते, ही बाब लक्षात घेतली जात नाही. शालिकराम व बद्री गरकळ या भावांनी मात्र आईच्या अस्थी नदीपात्रात विसर्जित न करता या गैरसमजालाही तिलांजली दिली.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड