शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटी घनमीटर गाळ उपसा करण्याचे नियोजन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 13:59 IST

वाशिम जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात सुमारे दिड कोटी घनमीटर गाळ उपसा करण्याचे प्रस्तावित आहे. संबंधित यंत्रणांनी नियोजनबध्द काम करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनचा मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार वाशिम जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात दीड कोटी घनमीटर गाळ उपसा करण्याचे नियोजन असून, त्या अनुषंगाने कामांचे अंदाजपत्रक बनवून तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी शनिवारी जिल्हा प्रशासनाला दिल्या.दवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने जिल्ह्यातील अनेक गावांना हिवाळ्यापासूनच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे होण्यासाठी शासन, प्रशासन व भारतीय जैन संघटना यांच्यावतीने ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ हाती घेण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाची अधिकाधिक कामे पूर्ण करून जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. भारतीय जैन संघटना जलसंधारणाच्या कामासाठी मोफत जेसीबी व पोकलेन मशीन उपलब्ध करून देणार आहे तर यासाठी लागणारे डीझेल शासनामार्फत पुरविले जाणार आहे. जिल्ह्यात सुमारे दिड कोटी घनमीटर गाळ उपसा करण्याचे प्रस्तावित आहे. हे काम १५ जून २०१९ पूर्वी पूर्ण होण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी नियोजनबध्द काम करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.  तलावांमधील गाळ काढण्यासोबतच नाला खोलीकरण, मोठी तळी यासारखी कामे केली जाणार आहेत. संबंधित यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे. क्षेत्रभेटी देवून प्रत्यक्ष पाहणीद्वारे कामाची निवड, त्याचा आराखडा तयार करून कामांचे अंदाजपत्रक बनवून तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना डवले यांनी शनिवारी जिल्हा प्रशासनाला दिल्या. जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या या कामांमध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून सदर अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

टॅग्स :washimवाशिम