शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

केबल टाकताना फुटली पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 18:23 IST

वाशिम : परराज्यातील ‘जेसीबी’व्दारे भुमिगत ‘केबल’ टाकण्याचे काम सुरू असताना पाईपलाईन फुटली. यामुळे वनोजा ३ गावे, दुबळवेल ८ गावे आणि जऊळका ३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : परराज्यातील ‘जेसीबी’व्दारे भुमिगत ‘केबल’ टाकण्याचे काम सुरू असताना पाईपलाईन फुटली. यामुळे वनोजा ३ गावे, दुबळवेल ८ गावे आणि जऊळका ३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला. दरम्यान, ‘जेसीबी’वर असलेल्या मजूरांना मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषा कळत नसल्याने नेमक्या कुठल्या कंपनीकडून केबल टाकण्याचे काम सुरू आहे, याचा पत्ता लागत नसल्याने कारवाई करताना अडचण निर्माण झाली आहे. याप्रकरणी जऊळका पोलिस ठाण्यात रितसर तक्रार नोंदविल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता के.के. जीवने यांनी दिली.वनोजा ३ गावे, दुबळवेल ८ गावे आणि जऊळका ३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सद्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ताब्यात आहेत. याअंतर्गत १४ गावांना पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान, कुठल्यातरी कंपनीने भुमिगत ‘आॅप्टीकल फायबर केबल’ टाकत असताना ते चक्क पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनमधून टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे ठिकठिकाणी पाईपलाईन फुटल्याने संबंधित चौदाही गावांना होणारा पाणीपुरवठा प्रभावित झाला. यामुळे गावकºयांना कृत्रीम तथा भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, पाईपलाईल फुटल्याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता जीवने यांच्यासह त्यांच्या चमुने बाधीत झालेल्या ठिकाणांना भेटी देवून पाईपलाईन जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बºयाच लांबपर्यंत पाईपलाईन फुटलेली असल्याने संपूर्ण दुरूस्ती करण्यास बराच कालावधी लागणार असल्याचे जीवने यांनी सांगितले.  ‘जेसीबी’ मालकाचाही पत्ता लागेना!पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फोडून १४ गावांचा पाणीपुरवठा प्रभावित करण्यास कारणीभूत ठरलेल्या कंपनीसोबतच ‘जेसीबी’च्या मालकाचाही पत्ता लागेनासा झाला आहे. ‘जेसीबी’वर असलेल्या एच. ३० एझेड ००९८ या क्रमांकाची आॅनलाईन चौकशी केल्यानंतर ‘डिटेल्स नॉट फाऊंड’चा संदेश येत असल्याचे मजिप्राचे कार्यकारी अभियंता के.के. जीवने यांनी सांगितले. त्यामुळे हा जेसीबी नेमका कुणाचा, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अद्याप पत्ता न लागलेल्या कंपनीच्या ‘जेसीबी’ने बेकायदेशीररित्या खोदकाम करून पाणीपुरवठा योजनांची पाईपलाईन फोडले. यामुळे वनोजा ३ गावे, दुबळवेल ८ गावे आणि जऊळका ३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. याप्रकरणी जऊळका पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली असून दोषी कंपनीचा शोध घेणे सुरू आहे. संबंधित गावांमधील नागरिकांनीही याकामी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला सहकार्य करणे अपेक्षित आहे.- के.के. जीवने, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वाशिम

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई