शिरपूर येथील मालेगाव रस्त्यालगत सय्यद नूर या शेतकऱ्याच्या शेतानजीक असलेल्या रोहित्रामधून वामन जाधव यांच्या शेताकडे वीज पुरवठा करण्यासाठी वाहिनी जोडण्यात आली आहे. या वाहिनीसाठी उभारलेला एक वीज खांब चार दिवसापूर्वी कोसळून जमिनीवर पडला. त्यातच रोहित्रही नादुरुस्त झाले. त्यामुळे चार दिवसांपासून या परिसरातील शेतीला सिंचनासाठी केला जाणारा वीज पुरवठा खंडित झाला आहे. सद्यस्थितीत गहू हरभरा व संत्रा पिकांना पाणी देणे गरजेचे आहे, परंतु रोहित्र नादुरुस्त झाले असतानाच वीज वाहिनीचा खांबही जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या प्रकाराकडे मालेगाव येथील महावितरण कार्यालयाचे दुर्लक्ष आहे. वीज वाहिनीचा खांब पडल्याने आणि रोहित्र नादुरुस्त असल्याचे शुभा अनंत देशमुख या शेतकऱ्याने सांगितले. मागील चार दिवसापासून वीज वाहिनीचा खांब पडूनही याकडे महावितरण कंपनी दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
वाहिनीचा खांब कोसळला, रोहित्रही नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:40 IST