मंगरुळपीर : उपविभागातील तीन तलाठय़ांवर केलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी उपविभागातील मंगरूळपीर, कारंजा, मानोरा तालुक्यातील तलाठय़ांनी २७ ऑगस्टपासुन लेखनी बंद आंदोलनाला सुरूवात केली आहे. मंगरूळपीर उपविभागातील कार्यरत तलाठी एम.एस.भांडे, बि.एस.खाडे, उमाली एकघरे यांचेवर अन्यायकारक निलंबनाची कारवाई करण्यात आली. संबधीत तलाठय़ावर कारवाई करतांना सादर केलेल्या निवेदनाचा विचार करण्यात आला नाही, असा आरोप तलाठी संघटनेने केला आहे. नैसर्गीक आपत्तीचे सर्व्हेक्षण हे शासन नियमाप्रमाणे चमुचे माध्यमातुन केल्या जाते. ही बाब विचारात घेण्यात आली नाही. चमुव्दारे सर्व्हेक्षण पुर्ण झाल्यावर सर्व यादय़ा प्रसिध्दीस देण्यात आल्या होत्या. आक्षेपास कालावधी देण्यात आला होता. ही बाब विचारात घेण्यात आली नाही, असा संघटनेचा आरोप आहे. सदर तलाठय़ावरील निलंबनाची कारवाई मागे न घेतल्यास संपुर्ण जिल्हय़ात लेखणी बंद आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा विदर्भ तलाठी संघाने दिला आहे.तसेच तलाठय़ावर केलेल्या कारवाईचे निलंबन मागे घ्या या मागणीसाठी कारंजा तालुक्यातील विदर्भ पटवारी संघ नागपूर च्या पदाधिकार्यांनी २७ ऑगस्टपासून लेखणीबंद आदोलन सुरु केले आहे. यामध्ये अध्यक्ष एल.एन.धोत्रे, उपाध्यक्ष जी.बी.मनवर, सचिव दतात्रय देशपांडे सहसचिव व्ही. झेड.राठोड व सदस्य प्रभाकर ठाकरे, संदिप गुल्हाने आदी असंख्य पटवारी कामबंद आंदोलन करुन तहसिल कार्यालय परीसरात बसले आहेत. यामुळे नागरीकांना व विद्यार्थ्यांना मिळणारे दाखल्यासाठी वनवन भटकावे लागत आहे.
तलाठय़ांचे लेखणी बंद आंदोलन सुरु
By admin | Updated: August 28, 2014 02:25 IST