लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : कोरोना या संसर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारच्यावतीने संपूर्ण देशभर साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आलेला असतानाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे परराज्यातील भाविक भक्त सामूहिकरीत्या ये-जा करीत असल्याचे दिसून येत आहे.सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी आहे. जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकारी यांच्या कडून काढण्यात आलेले आहेत यामध्ये जिल्ह्यातील पवित्रस्थळे, आठवडीबाजार,प्रार्थनास्थळे, सामूहिक विवाह समारंभ,जास्त गर्दी होण्यासारखे ठिकाणे ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचे स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे.. प्रशासनाकडून आतापर्यंत जनतेला सूचना पत्र देऊन विनवण्या करण्यात आल्या. वाशिम जिल्ह्यातील विविध समाज घटकाने याला सकारात्मक प्रतिसादही दिला आहे.धर्मगुरू महान तपस्वी डॉ. रामराव महाराज यांनीही जनतेने आणि भाविक भक्तांनी कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केलेले असतानाही पोहरादेवी या तीर्थक्षेत्री विविध परराज्यातून भाविक भक्त येत आहेत. पोहरादेवी परिसरामध्ये जमाव बंदी कायदा लागू केलेले असतानाही या तीर्थक्षेत्री श्रद्धाळू ये-जा करीत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थता निर्माण झालेली आहे.तेलंगणा,आंध्र,कर्नाटक या राज्यातून येणाº्या या भाविक भक्तांमध्ये कोरोना विषाणू वाहक भक्त असू शकत असल्याने खबरदारी घेणे गरजेचे आहे. प्रशासनाने सदरील विषय गांभीयार्ने घेऊन पोहरादेवी परिसरांमध्ये इतर राज्यातील कुणीही भाविक भक्त कुठल्याही परिस्थितीत दाखल होऊ नये याची खबरदारी घ्यावी, ज्यांच्यामुळे कोरोना या विषाणूचा संसर्ग पोहरादेवी परिसरातील नागरिकांमध्ये होईल असे ग्रामस्थांत बोलल्या जात आहे.
परराज्यातील भाविक तीर्थक्षेत्र पोहरादेवीला दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 18:18 IST