कारंजा लाड : तालुक्यातील ग्राम निंबा जहॉगीर येथील शेतमजुर विश्वनाथ श्रीराम तुरक हा शेत काम करण्यासाठी शेतात गेला असता. झुडपात दडून बसलेल्या रानडुकरांने शेतमजुरावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना २७ जुन रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास निंबा शेतशिवारात घडली. कारंजा तालुक्यातील निंबा जहॉगीर येथील शेतकरी विश्वनाथ श्रीराम तुरक हे शेतमालक प्रभाकर उगले यांच्या शेतात मजुरी काम करण्यासाठी गेला होते. शेतात काम करीत असताना अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढवून गंभीर जखमी केले. रानडुकराच्या हल्ल्यात श्रीराम तुरक यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर रानडुकराने हल्ला केल्याची माहिती मिळताच गावातील मंगेश उगले व गावकºयांनी त्यांना प्राथमिक उपचारा करीता ग्रामीण रूग्णालयात भरती केले. कारंजा तालुक्यात शेतकºयांवरील रानडुकरांच्या हल्ल्यात मोठ वाढ झाली असल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर वनविभागाने उपाययोजना कराव्या, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
शेतमजुरावर रानडुकराचा हल्ला; शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 15:33 IST
कारंजा लाड : तालुक्यातील ग्राम निंबा जहॉगीर येथील शेतमजुर विश्वनाथ श्रीराम तुरक हा शेत काम करण्यासाठी शेतात गेला असता. झुडपात दडून बसलेल्या रानडुकरांने शेतमजुरावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना २७ जुन रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास निंबा शेतशिवारात घडली.
शेतमजुरावर रानडुकराचा हल्ला; शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण
ठळक मुद्दे कारंजा तालुक्यातील निंबा जहॉगीर येथील शेतकरी विश्वनाथ श्रीराम तुरक हे शेतमालक प्रभाकर उगले यांच्या शेतात मजुरी काम करण्यासाठी गेला होते. शेतात काम करीत असताना अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढवून गंभीर जखमी केले.. रानडुकराच्या हल्ल्यात श्रीराम तुरक यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली.