शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांचा शारीरिक आणि बौद्धिक सरावही क्रीडांगणावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 15:40 IST

अनेक तरुण, तरुणी क्रींडागणावरच शारीरिक आणि बौद्धिक सराव करीत असल्याचे चित्र मंगरुळपीर तालुका क्रीडा संकुलावर पाहायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: विविध स्पर्धा परिक्षांत यशस्वी होण्यासाठी सुशिक्षीत तरुण, तरुणींची मोठी धडपड सुरू आहे. स्पर्धेच्या युगात प्रत्येक क्षण उपयोगी पडावा म्हणून अनेक तरुण, तरुणी क्रींडागणावरच शारीरिक आणि बौद्धिक सराव करीत असल्याचे चित्र मंगरुळपीर तालुका क्रीडा संकुलावर पाहायला मिळत आहे.सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या काळात स्वत:ला सिद्ध करून अस्तित्व टिकविण्यासाठी प्रत्येकाला मोठी धडपड करावी लागत आहे. स्पर्धेच्या युगात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी युवकांची मोठी कसोटी लागत आहे. महाविद्यालयात तासिका आटोपल्यानंतर फावल्या वेळेत वर्गमित्रांशी अभ्यासविषयक चर्चा करणे, वर्ग आटोपला की, घरी बॅग टाकून लगेच शिकवणी वर्गाला जाणे आणि नंतर उरलेल्या वेळेत स्वत:ची महत्त्वाची कामे आटोपून लगेच अभ्यासाला भिडणे, हा बहुतांश महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जणू जीवनक्रमच ठरत आहे. एवढे करून स्वत:ला स्पर्धेत टिकविण्यासाठी सदृढ राहणे, शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी त्यांना धडपड करावी लागत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील शेकडो सुशिक्षीत युवकही याला अपवाद नाहीत. तालुक्यातील बरेच युवक शहराच्या मध्यभागी असलेल्या तालुका क्रीडा संकुलावर शारीरिक सरावासाठी सकाळ, संध्याकाळ नियमित येतात. शारीरिक सराव आटोपल्यानंतर वेळ व्यर्थ खर्च होऊ नये म्हणून अनेक तरुण, तरुणी क्रीडांगणावरच स्पर्धा परिक्षेचा अभ्यासही करतात. गेल्या अनेक दिवसांपासून हा त्यांचा क्रम सुरूच आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर