शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कृषी आयुक्तालयाने मागविली पीक नुकसानाची छायाचित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 14:30 IST

छायाचित्रांच्या निरीक्षणानंतरच कृषी आयुक्तालयाकडून केंद्र शासनाकडे नुकसानाचा अंतिम अहवाल पाठविला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अवकाळी पावसाने जिल्ह्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांंना भरपाई देण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने एक सर्वकष अहवाल तयार करून कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडे पाठविण्यात आला. याअहवालाची पडताळणी सुरू असतानाच जिल्ह्यातील सर्व पीकविमाधारकांच्या नुकसानाची छायाचित्रे मागविण्यात आली असून, या छायाचित्रांच्या निरीक्षणानंतरच कृषी आयुक्तालयाकडून केंद्र शासनाकडे नुकसानाचा अंतिम अहवाल पाठविला जाणार आहे.जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या पिकांसह काढणी केलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानामुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने महसूल व कृषी विभागाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सुचना केल्या. प्रत्यक्षात जिल्ह्यात २ लाख ९६ हजार १२५ शेतकºयांनी २ लाख ४ हजार ७८५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा उतरविला होता. त्यातील १ लाख ५२ हजार १९४ शेतकºयांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानापोटी विम्याचा लाभ मिळण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केले. या अर्जानुसार प्रशासनाने शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामेही केले. यानुसार पीक विमा काढणाºया शेतकºयांपैकी ६५ हजार ५४८ शेतकºयांच्या २८ हजार २६७ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील उभ्या पिकांचे, तर १ लाख ३७ हजार ८५२ शेतकºयांच्या १ लाख ४३ हजार ७९८ हेक्टर क्षेत्रातील काढणी केलेल्या पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले. अर्थात पीक विमा काढणाºया एकूण २ लाख ३ हजार ४०० शेतकºयांच्या १ लाख ७२ हजार ६५ पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकºयांना पीकविम्याच्या निकषानुसार मदत देण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने एक सर्वकष अहवाल तयार करून तो कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडे पाठविण्यात आला. या अहवालात बाधित शेतकºयांची नावे, गावे, पेरणीचे क्षेत्र, बाधित क्षेत्र ही अचूक माहिती नमूद करण्यात आली आहे. तथापि, या अहवालाची पडताळणी सुरू असतानाच आता कृषी आयुक्तालयाने पीकविमाधारक शेतकºयांच्या नुकसानाची प्रशासनाने काढलेली छायाचित्रे मागविली आहेत. अर्थात आता कृषी विभागाला २ लाख ३ हजार ४०० शेतकºयांच्या शेतातील नुकसानाची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे पाठवावी लागत आहेत. कृषी विभागाकडून ही छायाचित्रे पाठविण्यातही येत आहेत.(प्रतिनिधी)शेतकºयाच्या नावासह छायाचित्राची होणार पडताळणीजिल्ह्यात आॅक्टोबरच्या अखेरीस आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे उभ्या आणि काढणी पश्चात पिकांचे जे नुकसान झाले. त्याचा सचित्र अहवाल तयार करण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. प्रशासनाने ही प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यानंतर केंद्रीय पथकानेही नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. त्यानंतर कृषी विभागाने पीकविमाधारकांच्या नुकसानाचा अहवालही कृषी आयुक्तालयाकडे पाठविला. आता या अहवालासोबत प्रत्यक्ष शेतकºयाचे नाव असलेले नुकसानाचे छायाचित्र मागविण्यात आले असून, अहवालानुसार शेतकºयाच्या नावासह छायिाचत्रातील नुकसानाची पडताळणी कृषी आयुक्तालयाकडून करण्यात येणार आहे.पीकविमाधारक शेतकºयांच्या नुकसानाचा अहवाल कृषी आयुक्तालयाकडे पाठविण्यात आल्यानंतर आता नुकसानाची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे त्यांच्याकडून मागविण्यात आली आहेत. अहवालानुसार शेतकºयांचे नुकसान दर्शविणाºया छायाचित्रांची पडताळणी त्यांच्याकडून करण्यात येणार आहे.-एस. एम. तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी