शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

किडीमुळे संत्रा पिक धोक्यात; कृषी शास्त्रज्ञांकडून पीक पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 12:38 IST

मूंगळा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील मूंगळा परिसरातील संत्रा पिकावर किडीने हल्ला चढविल्याने शेतकºयांची डोकेदुखी वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमूंगळा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील मूंगळा परिसरातील संत्रा पिकावर किडीने हल्ला चढविल्याने शेतकºयांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान शेतकºयांना मार्गदर्शन म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी संत्रा फळबागेची पाहणी उपाययोजनांची माहिती दिली.आॅरेंज व्हिलेज म्हणून मूंगळा या गावाची ओळख आहे. येथील बहुतांश शेतकरी संत्रा फळबागेकडे वळले आहेत. सद्यस्थितीत संत्रा फळबागेवर किडीने हल्ला चढविला आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकºयांनी केली होती. याची दखल घेत १३ मे रोजी कृषी शास्त्रज्ञांनी मूंगळा गावाला भेट देऊन मार्गदर्शन केले. कीटक शास्त्रज्ञ डॉ. योगेश इंगळे व फलोत्पादन शास्त्रज्ञ डॉ. दिनेश पैठणकर यांनी संत्रा पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन व बहार व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी मालेगाव तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरुणकर उपस्थित होते. यावेळी शास्त्रज्ञांनी सांगितले की, संत्रा पिकावर सद्यपरिस्थितीत ‘काळी माशी’ नामक किड असून यानंतर त्यावर कोळशी देखील येऊ शकते. परंतु त्यावर फवारणी केल्यास ही किड आटोक्यात येऊ शकते, याची माहिती शेतकºयांना दिली. कोणत्या किटकनाशकांची फवारणी करावी, याचीही माहिती दिली. किडीचा प्रादुर्भाव पाहून १५ दिवसांनी परत एक फवारणी करावी, असा सल्ला दिला. सेंद्रिय शेती करणाºया शेतकºयांनी निंबोळची फवारणी ३५ मिली प्रति १० लिटर पाण्यात करावी किंवा चांगल्या प्रतीचे निंबोळी तेल ३५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असा सल्ला दिला. रासायनिक अथवा सेंद्रिय दोन्हीही फवारणीमध्ये झाड संपूर्ण ओले होईल अशा प्रकारे फवारणी आवश्यक आहे, असे डॉ. इंगळे व डॉ. पैठणकर यांनी सांगितले. यावेळी शेतकºयांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी