शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विविध उद्योग, व्यवसायासाठी परवानगी बंधनकारक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 10:48 IST

उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी सक्षम प्राधिकारी नियुक्त करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अर्थव्यवस्थेला गती मिळण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यात काही उद्योग-व्यवसायांना संचारबंदीतून शिथिलता देण्यात आली आहे. संबंधित उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी सक्षम प्राधिकारी नियुक्त करण्यात आले. याबाबतचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी २० एप्रिल रोजी जारी केला. जिल्हाधिकारी कार्यालयातही परवानगी प्रक्रियेसाठी एक खिडकी योजनेत कक्ष स्थापन करण्यात आला.सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, पाणी पुरवठा व इतर विभागांची बांधकामे यासाठी परवानगी देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. मोटरपंप, अवजड यंत्र, पाणीपुरवठा करणारे पंप, यंत्र व कृषिसाठी लागणारे पंप व बॅटरी यांची दुकाने सुरु करण्यासाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.राज्य शासनाच्या १७ एप्रिलच्या अधिसूचनेत नमूद आवश्यक सेवांबाबतची दुकाने व आस्थापना सुरू करण्यासाठी परवानगी देण्यासाठी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आवश्यक कामे आणि पांदण रस्ते यांची परवानगी प्रक्रिया संबंधित कार्यक्षेत्रातील तहसीलदार यांच्या अखत्यारीत पूर्ण केली जाईल. एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांना एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडून, तर एमआयडीसी क्षेत्राबाहेरील उद्योगांना जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक यांच्याकडून परवानगी देण्यात येईल. जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतुकीचे परवानगी देण्याचे अधिकार पोलीस विभागाकडे देण्यात आले आहेत. फरसाण, कन्फेक्शनरी इत्यादी सेवांबाबत संबंधित कार्यक्षेत्रातील उपविभागीय अधिकारी परवानगी देतील.

अशी राहणार दुकानांची वेळकृषि उत्पन्न बाजार समित्यांची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठेवण्यात आली. कृषि सेवा केंद्रांचा कालावधी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत करण्यात आला आहे. दुध संकलन केंद्र सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत व संध्याकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहू शकतील. बँकांची, एटीएमची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत राहील. वैद्यकीय सेवा २४ तास सुरु राहतील. याव्यतिरिक्त इतर सर्व परवानगी दिलेल्या जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाºया आस्थापना, दुकाने यापूर्वी प्रमाणेच सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु राहतील. लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

जिल्ह्यात संचारबंदी तसेच लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना प्राधिकृत करण्यात आले आहे. संचारबंदी आदेशाचा भंग झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता कलम १४४ अन्वये कारवाई करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

टॅग्स :washimवाशिम