शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे प्रमाण अवघे ९ टक्के !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 16:43 IST

वाशिम : जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अपवाद वगळता अन्य बँकांकडून अपेक्षित सहकार्य मिळणे दुरापास्त झाल्याने मुदत संपत आली असताना खरीप पीक कर्जवाटपाचे प्रमाण मात्र २५ जूनपर्यंत अवघ्या ९ टक्क्यांवरच असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देशासनाकडून पाठविली जाणारी कर्जमाफीची शेवटची यादी अद्याप अप्राप्त आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतल्याने ते खरीप पीक कर्जासाठी अद्याप पात्र ठरले नाहीत. काही शेतकऱ्यांनी दीड लाख रुपये वगळता उर्वरित रक्कम भरली नसल्याने ते देखील कर्ज मिळण्यापासून वंचित आहेत.

वाशिम : जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अपवाद वगळता अन्य बँकांकडून अपेक्षित सहकार्य मिळणे दुरापास्त झाल्याने मुदत संपत आली असताना खरीप पीक कर्जवाटपाचे प्रमाण मात्र २५ जूनपर्यंत अवघ्या ९ टक्क्यांवरच असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने केलेले प्रयत्न यामुळे निष्फळ ठरत असून पीक कर्जाची मागणी करणारे शेतकरीही पुरते हतबल झाले आहेत.शासनाकडून पाठविली जाणारी कर्जमाफीची शेवटची यादी अद्याप अप्राप्त आहे. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतल्याने ते खरीप पीक कर्जासाठी अद्याप पात्र ठरले नाहीत. याशिवाय कर्ज पुनर्गठीत झालेल्या काही शेतकऱ्यांनी दीड लाख रुपये वगळता उर्वरित रक्कम भरली नसल्याने ते देखील कर्ज मिळण्यापासून वंचित आहेत. ज्यांना पीक कर्ज हवे आहे, त्यांना बँकेकडून पुरेसे सहकार्य मिळणे अशक्य झाले. एकूणच या सर्व प्रतिकुल बाबींमुळे खरीप पीक कर्ज वाटपाची मुदत संपण्याच्या मार्गावर आली असताना २५ जूनपर्यंत कर्ज वाटपाचे प्रमाण १,४७५ कोटींच्या तुलनेत १४४ कोटींच्या आसपास असल्याचे दिसून येत आहे. तथापि, जिल्हयातील पात्र असलेल्या सर्व शेतकºयांना वेळेत पीककर्ज मिळण्यासाठी सर्व बॅकांनी शाखानिहाय चोख नियोजन करावे, बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पुर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यातील सर्व बॅकांना दिले आहेत. यासंदर्भात चालू हंगामात चार ते पाच वेळा संबंधित सर्व बँक प्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा बैठका देखील घेण्यात आल्या. मात्र, याऊपरही कर्ज वाटपाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत नाही. 

 प्रशासनाच्या ‘व्हाट्सअप’ क्रमांकावर दैनंदिन तक्रारी!

जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या पीक कर्ज नोंदणी संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज नोंदणी करणाºया शेतकºयांच्या अर्जावर बँकेने कोणती कार्यवाही केली, याची माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने सर्व बँकांना दिले आहेत. याशिवाय पीक कर्जाविषयी कुठलीही तक्रार असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरु केलेल्या ‘ई-लोकशाही’ कक्षात ती नोंदवावी.  तसेच यासंदर्भातील तक्रार नोंदविण्याकरिता प्रशासनाने ८३७९९२९४१५ हा व्हाट्सअप क्रमांक जाहीर केला असून त्यावर दैनंदिन ८ ते १० शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. बँकेकडून नो-ड्यूज मागविले जाते, बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करते, पिकविम्याची रक्कम कर्ज खात्यात वळती केली जात आहे, अशासंदर्भातील तक्रारींचा त्यात समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी