शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकांसाठी जनतेला हेलपाटे; प्रशासन सुस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 14:41 IST

शेकडो अर्ज निकाली काढून शिधापत्रिका देण्यात प्रशासन दिरंगाई करीत असल्याच्या तक्रारी अर्जदारांकडून करण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात नव्या आणि विभक्त शिधापत्रिकांसाठी जनतेला वारंवार तहसील कार्यालयाच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत. विविध योजनांसाठी शिधापत्रिकांची प्रत आवश्यक असल्याने अर्जदार धडपड करीत आहेत. यात विद्यार्थ्यांनाही विविध शैक्षणिक कामकाजासाठी शिधापत्रिकेची प्रत आवश्यक आहे. तथापि, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेले शेकडो अर्ज निकाली काढून शिधापत्रिका देण्यात प्रशासन दिरंगाई करीत असल्याच्या तक्रारी अर्जदारांकडून करण्यात येत आहेत.नवीन, तसेच दुबार, विभक्तीकरण शिधापत्रिकांसाठी जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत हजारो लोकांनी सेतू केंद्रांमार्फत तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडे अर्ज सादर केले आहेतत. त्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजासाठी नव्या, विभक्त शिधापत्रिकांसाठी पालकांनी केलेल्या अर्जांचाही समावेश आहे. तथापि, तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडून निर्धारित मुदतीत शिधापत्रिका देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अर्जदारांना उद्या या, वारंवार तहसील कार्यालयाच्या वाºया कराव्या लागत असून, तहसील कार्यालयात गेल्यानंतरही अर्जदारांना प्रशासनाच्या दिरंगाईबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. सध्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सुरू असलेल्या अर्ज प्रक्रियेकरीता लोकांना शिधापत्रिकांची गरज असून, अनेक कुटूंबांच्या शिधापत्रिकांत बदल करावयाचा किंवा जीर्ण झालेल्या शिधापत्रिकांचे नूतनीकरण करावयाचे आहे, तसेच पुढील शैक्षणिक सत्रात विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांनीही शिधापत्रिकांसाठी अर्ज केले आहेत. तथापि, या संदर्भात घेतलेल्या माहितीनुसार मालेगाव आणि रिसोड तहसील कार्यालय वगळता इतर सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित असल्याची माहिती मिळाली. एजंटकडून पैशाच्या मागणीचेही प्रकारसेतूकेंद्रामार्फत नवीन, विभक्त किंवा दुबार शिधापत्रिकांसाठी अर्ज करणाऱ्यांना शिधापत्रिका मिळण्यास विलंब होत असतानाा तहसील कार्यालय परिसरात कार्यरत एजंट त्यांच्याशी संपर्क साधून शिधापत्रिका तातडीने मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी करीत असल्याच्या तक्रारी अर्जदारांकडून नाव उघड न करण्याच्या अटीवर करण्यात येत आहे.

नव्या किंवा विभक्त शिधापत्रिकांसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ही कागदपत्रे सादर केली नसतील किंवा अर्जात काही त्रुटी असेल, तर शिधापत्रिका मिळण्यास विलंब लागू शकतो; परंतु जिल्ह्यात अर्जदारांना शिधापत्रिका मिळण्यास विलंब लावण्यात येत असेल, तर त्याबाबत माहिती घेऊन पुरवठा निरीक्षकांच्या बैठकीत जाब विचारून चौकशीही करू.- राजेंद्रसिंग जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी वाशिम

टॅग्स :washimवाशिम