शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

९ आॅगस्टपासून ‘पेन्शन क्रांती सप्ताह’; जूनी पेन्शन हक्क संघटनेची आंदोलनाची हाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 18:23 IST

मानोरा :  कर्मचाºयांवर अन्याय करणारी नवीन पेन्शन योजना रद्द करून जूनी पेन्शन योजना सुरू करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ९ आॅगस्टपासून पेन्शन क्रांती सप्ताह राबविला जाणार  आहे, अशी माहिती राज्य प्रसिध्दी प्रमुख बालाजी मोटे यांनी रविवारी दिली.

मानोरा :  कर्मचाºयांवर अन्याय करणारी नवीन पेन्शन योजना रद्द करून जूनी पेन्शन योजना सुरू करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ९ आॅगस्टपासून पेन्शन क्रांती सप्ताह राबविला जाणार  आहे, अशी माहिती राज्य प्रसिध्दी प्रमुख बालाजी मोटे यांनी रविवारी दिली.महाराष्ट्र शासनाच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ पासून रूजू झालेल्या कर्मचाºयांना तत्कालीन शासनाने १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना रद्द करून नवीन अंशदान पेन्शन योजना लागू केली. ही योजना कर्मचाºयांना अन्यायकारक असल्याने जुनी पेन्शन योजना कायम ठेवण्याच्या मागणीसाठी यापूर्वी संघटनेच्यावतीने विविध टप्प्यात आंदोलने केली. पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्यासह जिल्हाधिकारी, तहसीलदार आदींना निवेदन देण्यात आले. मात्र, शासनस्तरावर दखल घेण्यात आली नाही. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ९ आॅगस्टपासून ‘पेन्शन क्रांती सप्ताह’ राबविण्यात येणार आहे. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाºयांना किती रुपये पेन्शन मिळणार? हा प्रश्न  गुलदस्त्यात आहे. नवीन पेन्शन योजनेनुसार सेवेत असताना काही कर्मचारी मयत झाले. परंतु शासनाकडून त्यांच्या वारसाला आजपर्यंत कसलाही आर्थिक दिलासा मिळाला नाही. अशा कुटुंबाना त्वरीत कुटुंबनिवृत्ती वेतन योजना सुरू करावी, अशी संघटनेने वारंवार मागणी केली. एवढच नाहीतर संघटनने कित्येक वेळा राज्यव्यापी आंदोलने करूनही शासनाला काहीच फरक पडत नाही, असा आरोप करीत पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलनाची हाक जूनी पेन्शन हक्क संघटनेने दिली आहे, अशी माहिती प्रसिध्दी प्रमुख मोटे यांनी रविवारी दिली.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन