शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

वारा जहॉगिर प्रकल्पबाधितांची ससेहोलपट; भूसंपादन मोबदल्यासह अनेक प्रश्न प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 18:03 IST

देपूळ (वाशिम) : येथून जवळच असलेल्या वारा जहॉगिर येथे शेतकºयांचे सिंचन प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी मिळण्यात अडचणी असताना भूसंपादन मोबदला, अतिरिक्त बाधीत जमिनीचा मोबदला, पर्यायी रस्ता, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे हा प्रकल्प शेतकºयांसाठी फायद्याऐवजी डोके दुखी ठरत आहे

लोकमत न्यूज नेटवर्क देपूळ (वाशिम) : येथून जवळच असलेल्या वारा जहॉगिर येथे शेतकºयांचे सिंचन प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी मिळण्यात अडचणी असताना भूसंपादन मोबदला, अतिरिक्त बाधीत जमिनीचा मोबदला, पर्यायी रस्ता, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे हा प्रकल्प शेतकºयांसाठी फायद्याऐवजी डोके दुखी ठरत आहेलघू पाटबंधारे विभाग वाशिमच्यावतीने वारा जहॉगिर येथे प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पासाठी शेतकºयांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. याबाबतचे भूसंपादन प्रस्ताव वाशिम जिल्हाधिकाºयांनी मंजुरही केले. त्यामुळे शेतकºयांना मोबदला मिळणे अपेक्षीत होते; परंतु चार महिने उलटले तरी शेतकºयांना मोबदला मिळाला नाही. त्याशिवाय शेतकरी विधवा, आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे भूसंपादन, अतिरिक्त बाधीत जमिनीचा मोबदला, पर्यायी रस्ता, गाळपेर कर पावत्या, भूभाडे, प्रस्तावही पाटबंधारे विभागाकडे प्रलंबित आहेत. या सर्व प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्याकडे शेतकºयांनी निवेदन सादर करून न्याय देण्याची मागणी केली. त्यावर उपरोक्त अधिकाºयांनी या निवेदनाच्या प्रती सदर प्रकल्पाची देखरेख आणि इतर जबाबदारी असलेल्या लघू पाटबंधारे  उपविभागीय कार्यालय मालेगावकडे पाठवित चौकशी करून कार्यवाहीचे आदेशही दिले. तथापि, या पत्राला दोन महिने उलटले तरी, त्यावरची धुळही पाटबंधारे मालेगावच्या उपविभागीय अभियंत्यांनी झटकलेली नाही.  वारा प्रकल्पाच्या जलाशयात उमरा शमशोद्दिन शिवारातील २२ शेतकºयांची जमीन बाधीत झाली. त्याची संयुक्त मोजणी २०१६ ला झाली आणि त्याचा मोबदला निश्चिती प्रस्ताव वारा सिंचन प्रकल्पाच्या जलाशयामध्ये २०१५ पासुन उमरा शम शिवारातील २२ शेतकºयांची अतिरिक्त जमीन बाधीत झाली. त्याची संयुक्त मोजणी २०१६ ला झाली तर त्याचा मोबदला निश्चिती प्रस्ताव जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत चार महिन्यांपूर्वी मंजूर झाला. तथापि, शेतकºयांना सरळ खरेदीव्दारे मोबदला देण्यास पाटबंधारे उपविभागीय कार्यालय मालेगावकडून टाळाटाळ होत आहे. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांनी शेतकºयांना हा मोबदला त्वरीत मिळावा म्हणून नागपूर महामंडळाकडे पाठपुरावा करून निधीही उपलब्ध करून घेतला; परंतु पाटबंधारे उपविभाग मालेगाव मात्र, शेतकºयांचा प्रश्न निकाली काढण्यात उदासीन आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पात देपूळच्या २० शेतकºयांची आणि उमरा शमशोद्दिनच्या चार शेतकºयांची आणखी बाधीत होत आहे. तथापि, त्याची संयुक्त मोजणी झालेली नाही. 

उमरा शम येथील बाधीत शतकºयांच्या जमीनीचा मोबदला तात्काळ मिळावा याकरिता मी स्वत: विदर्भ पाटबंधारे महामंडळाकडे पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करुन दिला. त्या शेतकºयांना त्वरित मोबदला देण्याचे लेखी कळविले असून, विविध प्रलंबीत प्रश्न मार्गी लावण्याच्या सुचना मालेगाव उपविभागीय कार्यालयाला देण्यात येतील. कळवितो-प्रमोद मांदळे, अधिक्षक अभियंता, लघू पाटबंधारे विभाग, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प