शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीचे चुकारे प्रलंबित: प्रशासनाच्या दिरंगाईपुढे शेतकरी हताश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 14:42 IST

नाफेडकडे तूर आणि हरभºयाची विक्री केलेल्या शेकडो शेतकºयांचे चुकारेही प्रलंबित आहेत. प्रशासनाच्या या दिरंगाईपुढे शेतकरी हताश झाले आहेत. 

ठळक मुद्दे हरभरा विक्रीसाठी जिल्ह्यातील एकूण ११ हजार ३७८ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली. १३ जूनपर्यंत ४ हजार शेतकºयांच्या हरभºयाची खरेदी झाली.विक्री न झालेल्या तूर, हरभºयाचे अनुदानही प्रशासनाच्या लालफितशाहितच अडकले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : किमान आधारभूत किंमतीनुसार हरभरा, तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केलेल्या; परंतू विहित मुदतीत खरेदी होऊ न शकलेल्या शेतकºयांना प्रती क्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने ५ मे २०१८ रोजी घेतला; परंतु अडीच महिने उलटले तरी  जिल्ह्यातील ३७ हजार शेतकºयांना यातील एक छदामही मिळाला नाही. विशेष म्हणजे नाफेडकडे तूर आणि हरभºयाची विक्री केलेल्या शेकडो शेतकºयांचे चुकारेही प्रलंबित आहेत. प्रशासनाच्या या दिरंगाईपुढे शेतकरी हताश झाले आहेत. किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने पणन महासंघ व विदर्भ पणन महासंघामार्फत तूरची खरेदी १ फेब्रुवारी २०१८ तर हरभरा खरेदी १ मार्च २०१८ पासून सुरू केली होती. यासाठी शेतकºयांना आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक होते. विहित मुदतीत आॅनलाईन नोंदणी केल्यानंतरही वाशिम जिल्ह्यातील तूर उत्पादक ३० हजार शेतकरी तर हरभरा उत्पादक सात हजार शेतकºयांच्या शेतमालाची खरेदी होऊ शकली नाही. १५ मे २०१८ पासून तूरीची खरेदी बंद झालेली आहे तर १४ जून २०१८ पासून हरभºयाची खरेदी बंद झालेली आहे. तूर व हरभरा विकण्यासाठी नोंदणी केलेल्या; परंतू त्यांच्याकडून तूर व हरभºयाची खरेदी झाली नाही अशा शेतकºयांना प्रती क्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय ५ मे २०१८ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला होता. त्या अनुषंगाने तूर व हरभºयाची खरेदी न झालेल्या शेतकºयांना प्रती क्विंटल एक हजार रुपये याप्रमाणे अनुदान मिळणार आहे. तूर विक्रीसाठी जिल्ह्यातील एकूण ४१ हजार ५८ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी १० हजार ६४८ शेतकºयांची एक लाख ४९ हजार ७९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली तर उर्वरीत ३० हजार ४१० शेतकºयांची तूर खरेदी होऊ शकली नाही. हरभरा विक्रीसाठी जिल्ह्यातील एकूण ११ हजार ३७८ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली. १३ जूनपर्यंत ४ हजार शेतकºयांच्या हरभºयाची खरेदी झाली. उर्वरीत सात हजार शेतकºयांच्या हरभºयाची खरेदी होऊ शकली नाही. दरम्यान, जिल्ह्यात नाफेडकडे तूर, हरभºयाची विक्री करणाºया शेकडो शेतकºयांना त्यांच्या मालाचे चुकारे चार महिन्यांपासून मिळाले नसून, विक्री न झालेल्या तूर, हरभºयाचे अनुदानही प्रशासनाच्या लालफितशाहितच अडकले आहे. महसूल विभागाची पडताळणी संथशासन निर्णयातील निकषानुसार तूर व हरभºयाच्या विक्रीसाठी नाफेडकडे नोंदणी केलेल्या मात्र शेतमाल खरेदी न झालेल्या शेतकºयांना प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान जाहीर करण्यात आले. दोन हेक्टर मर्यादेत २० क्विंटलपर्यंत तूर व हरभºयाचे अनुदान शेतकºयांना देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तूर व हरभºयाच्या विक्रीसाठी नोंदणी केलेल्या मात्र खरेदी न झालेल्या शेतकºयांची संख्या ३७ हजार आहे. या शेतकºयांच्या तूर व हरभरा पिकाचे क्षेत्र, पिकाचे उत्पादन आणि शेतकºयांनी बाजारात विकलेली तूर व हरभरा यासंदर्भात माहिती पडताळणीचे काम महसूल विभागाकडे सोपविले आहे; परंतु अडिच महिन्यांपासून ते अद्यापही पूर्णत्वास गेले नाही.

नाफेडने खरेदी केलेल्या तूर, हरभºयाचे शेकडो शेतकºयांचे चुकारे चार महिन्यांपासून निधीअभावी रखडले आहे. त्यांच्या हक्काची रक्कम देण्यास आमचे प्राधान्य आहे. त्याशिवाय शासन निर्णयानुसार तूर व हरभरा खरेदीसाठी नोंदणी केलेले; मात्र ज्यांच्या शेतमालाची खरेदी होऊ शकली नाही, अशा शेतकºयांना तूर आणि हरभºयासाठी प्रति क्विंटल १ हजार अनुदान देण्यात येणार आहे. या शेतकºयांच्या माहितीची पडताळणी करण्याचे महसूल विभाग करीत आहे. ती प्रक्रिया अद्याप झाली नाही.  - राजेश तराळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी