शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

वीज मीटर बदलल्यानंतरही ‘फाॅल्टी’च्या नावाखाली देयक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 12:18 IST

MSEDCL News देपूळ येथील ग्राहकाला ‘फॉल्टी’च्या नावाखाली विद्युत देयक आकारले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेपूळ : दोन वेळा वीज मीटर बदलून दिल्यानंतरही देपूळ येथील ग्राहकाला ‘फॉल्टी’च्या नावाखाली विद्युत देयक आकारले जात आहे. याप्रकरणाची चौकशी करून दोषीविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी वीजग्राहक गजानन सीताराम वाघमरे यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे बुधवारी केली.वाशिम तालुक्यातील देपूळ येथील गजानन वाघमारे यांनी घरगुती वीजजोडणी घेतली. परंतु काही वर्षांनंतर वीज मीटर बंद पडल्याने महावितरणकडे रितसर अर्ज करून ‘३१७५४०३८००५१’ या क्रमांकाचे मीटर बदलून ‘१२४४२८४०’ क्रमांकाचे वीज मीटर देण्यात आले. परंतु हे मीटर मंगरूळपीर तालुक्यातील मानोली येथील नागरिकाच्या नावाने ‘लाइव्ह’ केले. हा प्रकार संबंधित अभियंत्यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर उपरोक्त मीटर बदलून ‘८७४१७३८’ या क्रमांकाचे नवीन मीटर देण्यात आले. त्यामुळे या मीटरच्या रीडिंगप्रमाणे वीज देयक आकारणी होणे अपेक्षित आहे. परंतु जुन्या फॉल्टी मीटरनुसार वीज देयक आकारले जात आहे. विद्युत देयकात दुरुस्ती करून नवीन मीटरनुसार देयक देण्याची मागणी गेल्या सहा महिन्यांपासून महावितरणकडे करण्यात आली. परंतु, अद्याप यामध्ये दुरुस्ती झाली नाही. याकडे लक्ष देऊन दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी तसेच विद्युत देयकात दुरुस्ती करण्याची मागणी वाघमारे यांनी अधीक्षक अभियंत्यांकडे बुधवारी केली. दरम्यान, कोरोनाकाळात एप्रिल ते सप्टेंबर या दरम्यान मीटर रिडींग न घेता अनेकांना सरासरी विद्युत देयक आकारण्यात आले. यामुळे अनेकांना अव्वाच्या सव्वा देयके आली असून, यामध्येदेखील दुरूस्ती होणे गरजेचे आहे. 

नवीन वीज मीटर देऊन जुन्या वीज मीटरप्रमाणे देयके आकारणे, बदलून दिलेले मीटर दुसऱ्याच्या नावाने फीड करणे हा प्रकार गंभीर असून, त्याची सखोल चौकशी केली जाईल.- आर. जी. तायडे, कार्यकारी अभियंता महावितरण, वाशिम

टॅग्स :mahavitaranमहावितरणwashimवाशिम