शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देण्याची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 15:14 IST

वाशिम : जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या अकोला -हिगोली या राष्ट्रीय महामार्गासाठी ३२ गावांतील ७०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेतजमिन संपादित करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या अकोला -हिगोली या राष्ट्रीय महामार्गासाठी ३२ गावांतील ७०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेतजमिन संपादित करण्यात आली. तथापि, सहा महिन्यांत केवळ २०१ शेतकऱ्यां ना मोबदला देण्यात आला होता. या संदर्भात लोकमतने २४ एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने दखल घेत मोबदला देण्याच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. आजवर जवळपास ३४६ कोटीपैकी ९६ कोटींपेक्षा अधिक रकमेचे चुकारे अदा करण्यात आले असून, उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात रकमा जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.वाशिम जिल्ह्यातून जाणाºया पाच प्रमुख मार्गांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा देण्यात आला. या महामार्गांची कामे करण्यासाठी काही शेतकºयांची जमीन संपादित करणे आवश्यक होते. त्यात प्रामुख्याने जिल्ह्यातून जात असलेल्या वाशिम-हिंगोली या एन.एच. १६१ क्रमांकाच्या महामार्गासाठी वाशिम आणि मालेगाव तालुक्यातील ३२ गावच्या शेतकºयांची मिळून २३७ हेक्टर जमीन संपादन करण्याचा प्रस्ताव होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने यासंदर्भातील प्रक्रिया पार पाडण्यात आल्यानंतर उपविभागीय अधिकारी स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया राबविण्यास सुरूवात करून ३२ गावातील शेतकºयांची १५५ हेक्टरपेक्षा अधिक शेतजमीन संपादित करण्यात आली. शासनाने ठरविलेल्या दरानुसार शेतकºयांना मोबदला अदा करण्याचे निश्चित झाले आणि शेतकºयांना त्याबाबत माहितीही देण्यात आली. प्रत्यक्षात मात्र भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात केवळ २०७ शेतकºयांनाच बँकांमधून धनादेशांव्दारे मोबदल्याच्या रकमेचे वितरण करण्यात आले. निवडणुकीची आचारसंहिता आणि इतर तांत्रिक कारणांमुळेही यात खोळंबा निर्माण झाला होता. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर शेतकºयांना चुकारे अदा करण्यासाठी आवश्यक प्रक्रियेला उपविभागीय अधिकारी कार्यालयाने वेग दिला असून, आजवर ९६ कोटींपेक्षा अधिक रकमेचे चुकारे शेतकºयांना अदा करण्यात आले. ४१६ शेतकऱ्यांसाठी नोटीस तयारएनएच १६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गासाठी ज्या शेतकºयांची जमी आजवर संपादित करण्यात आली. त्यापैकी २०७ शेतकºयांना मोबदला मिळाल्यानंतर आता १३ गावांतील ४१६ शेतकºयांना मोबदल्यासाठी कागदपत्रे सादर करण्याच्या सुचना उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून तयार करण्यात आल्या आहेत. या नोटीसनंतर संबंधित शेतकºयांनी आवश्यक कागदपत्रे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर केल्यानंतर त्याची तपासणी करून शेतकºयांचे धनादेश बँकेकडे सादर करण्यात येणार आहेत.

महामार्गासाठी ज्या शेतकºयांची जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यांच्या प्रकरणातील आक्षेप व हरकतींचे निवाडे झाल्यानंतर मोबदला अदा करण्यात येत आहे. आजवर ९६ कोटींचे वाटप केले असून, ४१६ शेतकºयांना कागदपत्रे सादर करण्याच्या सुचना देण्यासाठी नोटीस तयार करण्यात आल्या आहेत.-प्रकाश राऊतउपविभागीय अधिकारीवाशिम

टॅग्स :washimवाशिमpwdसार्वजनिक बांधकाम विभागhighwayमहामार्ग