शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध पर्यटनस्थळ शिरपूरातील अतिक्रमण हटविण्याच्या हालचाली गतीमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 18:19 IST

मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र असलेल्या शिरपूर जैन येथील अतिक्रमण हटविण्यास होत असलेल्या विलंबामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान झाल्याची नोटीस जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली.

ठळक मुद्देमो. इमदाद बागवान यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याविषयी याचिका दाखल केली होती.२१ फेब्रुवारी रोजी निकाल देताना एका महिन्यात अतिक्रमण काढून शिरपूर विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र असलेल्या शिरपूर जैन येथील अतिक्रमण हटविण्यास होत असलेल्या विलंबामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान झाल्याची नोटीस जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली. त्यानुसार, आता अतिक्रमण हटविण्याची हालचाल गतीमान झाली असून बुधवारी भूमि अभिलेख विभागाकडून रस्त्यांची मोजणी करण्यात आली. मालेगाव तालुक्यातील शिरपूर हे पर्यटनक्षेत्र आहे. साहजिकच येथे येणाºया पर्यटकांची संख्या देखील मोठी आहे. त्यासाठी असलेल्या रस्त्यावर मात्र मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. ते हटविण्यास कुणीही धजावत नव्हते. दरम्यान, मो. इमदाद बागवान यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याविषयी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या याचिकेवर २१ फेब्रुवारी रोजी निकाल देताना एका महिन्यात अतिक्रमण काढून शिरपूर विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान झाल्यासंबंधी वन आणि महसूल विभागाच्या प्रधान सचिवांसह जिल्हाधिकारी, तहसिलदार व सरपंचांना नोटिस बजावण्यात आली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासंदर्भातील प्रक्रियेस सुरूवात केली आहे. त्यानुसार, २५ जुलै रोजी भूमि अभिलेख कार्यालयाच्या विशेष पथकाने शिरपूरात हजेरी लावून प्रत्यक्ष मोजणीस प्रारंभ केला. त्यामुळे आता निश्चितपणे शिरपूरातील अतिक्रमण हटविले जाणार असल्याच्या मुद्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसत आहे. वाशिम जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानुसार शिरपूर जैन गावातील रस्त्यांचे मोजमाप सुरू करण्यात आले आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करून प्रशासनाकडे अहवाल सादर केला जाणार आहे. अतिक्रमण हटविण्यासंदर्भात त्यानंतर निर्णय होईल.- एस.एस.काळे, मोजमाप परिक्षण अधिकारी,भुमि अभिलेख कार्यालय, मालेगाव.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन