शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

वेळ निघून गेल्याने आता गहू पिकाची पेरणी करू नये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 14:09 IST

वेळ निघून गेल्याने होणारा लागवड खर्च अधिक व त्यापासून मिळणारा नफा कमी राहणार असल्याने आता गव्हाची पेरणी करू नये.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रब्बी हंगामात गहू हे जिल्ह्यातील मुख्य पिक आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र जवळपास २८ हजार ४१७ हेक्टर असून यावर्षी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने त्यात वाढ होऊन ३४ हजार ७५२ हेक्टर क्षेत्रावर गव्हाचा पेरा झाला. तथापि, सद्याही काही शेतकरी गहू पिकाची पेरणी करण्याचे नियोजन करित आहेत; मात्र वेळ निघून गेल्याने होणारा लागवड खर्च अधिक व त्यापासून मिळणारा नफा कमी राहणार असल्याने आता गव्हाची पेरणी करू नये. उपलब्ध पाण्याचा जपून वापर करून पुढील पिकांकरिता पाणी राखून ठेवावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांनी केले.मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले पाणी ही केवळ वैयक्तीक मालमत्ता नसून सार्वजनिक संपत्ती व संसाधन आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. काही पिकांना अल्प प्रमाणात, तर काहींना मोठ्याप्रमाणात पाणी दिले तरच उत्पादन शक्य आहे. त्यानुषंगाने सामजिक दायित्व व बांधिलकीचा सर्वंकष विचार केल्यास उपलब्ध पाण्याच्या स्त्रोतांचे जतन व संवर्धन करणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार गहु या पिकाची उशिरात उशिरा पेरणी १५ डिसेंबरपुर्वीच उरकायला हवी. त्या तारखेनंतर पेरणी करु नये. केल्यास गहू पिकाला पोषक ठरणारे १०० थंडीचे दिवस (७ ते २१ डिग्री तापमान) प्राप्त होत नाही. परिणामी, उत्पादनात घट येते. याऐवजी शेतकºयांनी उन्हाळी तीळ, भूईमुग, मूग यासारख्या पिकांची लागवड केल्यास फायदेशीर ठरणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती