मालेगाव : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (विजुक्टा)ने १२ वी बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासणीस असहकार आंदोलन सुरू केले असून, यातून मार्ग काढण्याच्या दृष्टिकोणातून संघटनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री ना. डॉ. रणजित पाटील यांना शनिवारी निवेदन दिले. महासंघ व विजुक्टाने आपल्या २५ प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. यापूर्वीही आंदोलन केले; मात्र अद्यापही ठोस निर्णय झाला नाही. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (विजुक्टा)ने केलेल्या मागणी पत्रातील काही मागण्या अर्थखात्याशी संबंधित असल्यामुळे यातून मार्ग निघाला नाही. मागण्या मान्य होत नाही, तोपयर्ंत दरदिवशी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक केवळ एकच पेपर तपासतील, असे ठरविण्यात आले. या असहकार आंदोलनात जिल्हय़ातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. अनिल काळे यांनी केले.
पेपर तपासणीस असहकार!
By admin | Updated: February 29, 2016 02:17 IST